Posts

Showing posts from December, 2021

RICH असणं म्हणजे काय ?

*RICH असणं म्हणजे काय ?* .            *RICH* शब्दामधला  *‘R‘* हा            *Relationship* चा,            *‘I‘* हा *Income* चा,            *‘C‘* हा *Character* चा आणि            *‘H‘*हा *Health* चा.           *‘नातेसंबंध’, ‘पैसा’, ‘चारित्र्य’*           आणि *‘आरोग्य’* हे चारही स्तंभ            मजबूत आणि संतुलित असणं            म्हणजे *RICH* असणं.            यातला एक स्तंभ जरी डळमळीत            असेल किंवा मजबूत असूनही            संतुलित नसेल तरी बाकी सारं            असूनही आयुष्य विकलांग आहे.           चला... एकमेकाना wish करू            या आणि सगळेच जण...

परिघ

मला आई कधी कधी विचारते, “अरे तो अमुक तमुक आजही तुझ्या संपर्कात आहे का?” किंवा “आता ती अमकी तमकी तुला पहिल्यासारखी आजही फोन करते का?” या दोन्ही प्रश्नांची उत्तरे टेक्निकली #नकारार्थीच असतात. त्याचं आईला थोडं वाईट वाटतं. भांडणतंटे किंवा वादविवाद न होता माणसं तुटतात कशी? संबंध दुरावतात का? या प्रश्नांची कोडी माऊलीला आजतागायत उलगडलेली नाहीत. कारण खरंतर सोपं आहे, फक्त ते उमजायला हवं. युनिवर्सची एक स्वतंत्र सिस्टीम आहे. प्रत्येक माणसाच्या परिघात (Orbit 💫) अमुक एक व्यक्ती काही काळापुरत्या असतात. मग कार्य संपलं, भाग संपला की ती माणसं आपसूकच बाजूला सरतात आणि नवी मंडळी प्रवेशतात. परिघ कितीही विस्तारत गेला तरी माणसं येण्याजाण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु रहाते. ती Unending प्रक्रिया आहे. आणि ते व्हायला हवंच. ज्यांचा कार्यभाग संपला अशांची भावनिक ओझी परिघाने कशासाठी बाळगावीत? नव्या माणसांसोबत तुमची एनर्जी एक्स्चेंज कधी होणार? तीच तीच माणसं परिघात फिरत राहीली की predictable होतात आणि कंटाळवाणीही.... रक्ताच्या नात्यातील काही ठराविक मंडळी आणि कुटुंबिय यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ठिय्या मांडून बसण...

शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे

आदरणीय श्री. घोरपडे साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य महोदय - महोदया,   सस्नेह नमस्कार.  आपल्या सदिच्छांबद्दल कृतज्ञतापूर्वक धन्यवाद.  नाशिक जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्तीवेतन विषयक कामकाजाच्या निमित्ताने आलेल्या अनुभवासंबंधी सौ.कल्याणी रवींद्र पाठक – कुलकर्णी यांनी समाजमाध्यमांवर प्रसृत केलेल्या संदेशामध्ये नाशिक जिल्हा कोषागार कार्यालयाबरोबर ओघाने माझाही नामोल्लेख झाला आहे. सदर संदेश सर्वदूर अनेक Whatsapp समूहांवर अग्रेषित करण्यात आल्यामुळे नाशिक जिल्हा कोषागार कार्यालयाबद्दल तसेच तेथे कार्यरत अधिकारी आणि कर्मचारीवृन्दाबद्दल आस्था आणि आत्मीयता असणा-या अनेक मित्र-आप्त-सहकारी-वरिष्ठ आणि निवृत्तीवेतनधारक यांचेकडून आम्हा सर्वांवर कौतुकाचा भरभरून वर्षाव करण्यात आला. वस्तुत: सदर बाब कोषागार कामकाजाचा एक नियमित भाग असून निवृत्तीवेतनधारकांप्रती अशा प्रकारची तत्परता आणि संवेदनशिलता सर्वच कोषागार कार्यालयांकडून वारंवार प्रदर्शित करण्यात येत असते. आम्ही देखील तशीच कर्यवाही आमच्या कर्तव्याचा भाग म्हणून केली आहे. परंतु सौ. कल्याणीताईंनी अगदी छोट्याशा गोष्टीसाठी भारावून जाऊन आम...

सारे सारे निघून गेलेत

*सारे सारे निघून गेलेत.....* *कहीं दूर, कहीं दूर* *लता,आशा* आता गात नाहीत.. *भीमसेन, कुमारचे* सूर हरवलेत  *शिवकुमार, हरिप्रसाद* ही आता केव्हातरी.. *आर.डी.लक्ष्मी-प्यारे* शांत झालेत.. *कपिल,गावस्कर,तेंडुलकर* आता खेळत नाहीत.. *प्राण,कादर खान* ची दादागिरी संपली आहे.. *अमिताभ* ही आता फाइटिंग करत नाही.. *रेखा, हेमा, झीनत,* सा-यांचं सौंदर्य संपून गेलंय.. *अटलजींचं* ओघवतं हिंदी.. *बाळासाहेबांची* शिवाजी पार्कवरची गर्जना.. *इंदीवरच्या* गाजलेल्या मैफिली.. *जगजीत, मेहंदीचा* दर्दभरा आवाज.. *रफी, किशोरची* हृदयातली साद.. *मुकेशचं कारुण्य, मन्ना डे* चा पहाड़ी सूर.. सारे सारे निघून गेलेत  *"कहीं दूर, कहीं दूर"* *रेश्माची* तानही विरून गेली आहे.. *तलतची* मखमल विरून गेली आहे.. *पु.लं.चं* मिश्किलपणे गोष्टी सांगणं.. *बापट, विंदा, पाडगावकरांचं* कविता ऐकवणं.. *शंकर पाटीलांच्या* गावरान गप्पा व दमांची मिरासदारी संपलीय.. *हृदयनाथ, ग्रेसच्या* अविस्मरणीय मैफिली.. पल्लेदार संवादांनी जिवंत झालेला *काशीनाथ घाणेकरांचा* संभाजी.. *कडक, शिस्तप्रिय* तरीही प्रेमळ, हवासा सतिष दुभाषींचा प्राध्यापक.. आणि *भक्ति बर्...

नाटकं links

सर्व नामांकित नाटकं पाठवत आहे. रोज एक नाटक पहा. भरभरून आनंद लुटा आणि आपल्या मराठी भाषेला समृद्ध करा*... • सुंदर मी होणार https://youtu.be/L0BD4s5FQgM • हसवा फसवी https://youtu.be/v4-MqXYJq6o • बटाट्याची चाळ https://youtu.be/5i1xaSZeyOM • श्रीमंत दामोदर पंत https://youtu.be/U7350LnlKCk • शांतता ! कोर्ट चालु आहे https://youtu.be/QG_Pi051qao • नटसम्राट https://youtu.be/yTFPT7-v-Ws • ती फुलराणी https://youtu.be/PLHfek5SO_Q • तो मी नव्हेच https://youtu.be/8TAToq08YuQ • पती सगळे उचापती https://youtu.be/6IZXCmrE09s • मोरुची मावशी https://youtu.be/eCOeRK9N7QM • एका लग्नाची गोष्ट https://youtu.be/JZl_zwm_IPI • गेला माधव कुणीकडे https://youtu.be/1gEZ0WePqV4 • तुझे आहे तुजपाशी https://youtu.be/sTZGYKAWc_4 • असा मी असामी https://youtu.be/S38SOv4f95w • शांतेच कार्ट चालु आहे https://youtu.be/twOnQ3JCTxE • श्री तशी सौ https://youtu.be/N4pwOnoY7zY • वासु ची सासू https://youtu.be/-m3iruEQoJE • अखेरचा सवाल https://youtu.be/DmuCU9Y33sg • शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E Par...

light

आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय? 😀😀😀 जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत 😀😀😀 हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले 😀😀😀 मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता 😀😀😀 आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका जी व्यक्ती तुम्हाला तुमचा नेट पँक नसताना हाँटस्पाँट देते😀😀😀 मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो 😀😀😀 आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात” 😀😀😀 बायका फार नशीबवान असतात कारण त्यांना बायका नसतात 😀😀😀 हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ ...

लग्न म्हणजे नेमकं काय ?

*😊 लग्न म्हणजे नेमकं काय ?🤔😉* *'लग्न' हे सुंदर जंगल आहे जिथे  " बहादुर वाघांची " शिकार  मोहक हरिणी करतात !!*                        *लग्न म्हणजे*  *"अहो ऐकलंत का ?* *पासुन ते "बहिरे झालात की काय ??"* *पर्यंतचा प्रवास .!!*                      *लग्न म्हणजेच* *"तुझ्यासारखे या जगात कुणीच नाही"* *पासुन "तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत"!!* *पर्यंतचा प्रवास*                   *लग्न म्हणजे*  *"तुम्ही राहु द्या" पासुन ते*  *"मेहरबानी करून तुम्ही तर राहुच द्या"* *पर्यंतचा प्रवास ...*                  *लग्न...म्हणजे*  *"कुठे होती ग माझी राणी" पासुन तर* *"कुठे मेली होतीस" पर्यंतचा प्रवास*                    *लग्न म्हणजेच* *"तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला" पासुन ते* *"मेलं माझंच नशीब फुटकं, तुम्ही मला भेटलात"* *पर्यंतचा प्...

मृत्यू का येतो ,, ?

मृत्यू का येतो ,, ?                             जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.                        _*संत ज्ञानेश्वर*_ या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा  नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या,  होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह  निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.                    _*मृत्यू कधी येतो ?*_ मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास  सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला  एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही.  सद्गुरुंच्या क...

आयुष्यातले कप्पे

*आयुष्यातले कप्पे....* दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात आयुष्यात... कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा... कामाच्या कप्प्यात ऑफिस, करियर, सहकारी, कॉम्पिटीशन असं काय काय असतं.. कुटुंबाच्या कप्प्यात आपला जोडीदार, मुलंबाळं, आई-वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, घरदार, गाड्या-घोडे वगैरे असतं...  जगण्यासाठी दोन्ही कप्पे महत्वाचे... कामाच्या कप्प्यातून पैसा, यश, प्रसिद्धी आणि समाधान मिळतं... कुटुंबाच्या कप्प्यातून प्रेम, स्थैर्य, आधार आणि आनंद मिळतो...  एका कप्प्यात जे मिळतं त्यामुळे दुसऱ्या कप्प्यात जगता येतं...  यातला कामाचा कप्पा हा आपल्याला अजिबात न आवडणारा कप्पा... इथे कष्ट असतात, नियम असतात, भीषण स्पर्धा असते, करत असलेल्या कामाचं कोणाला कौतुक नसतं, आपल्या लायकीपेक्षा आणि कष्टांच्या मानानं खूप कमी मोबदला आपल्याला मिळत असतो... म्हणजे हे सगळं असं असतंच असं नाही... पण हे असं आहे असं आपल्याला सतत वाटत असतं!  कुटुंबाचा कप्पा तसा आपल्याला आवडतो... पण त्यातही डोक्याला शॉट्स असतात! पार्टनरशी भांडणं होत असतात... मुलं ऐकत नसतात... आई-वडील हट्टी बनत जात असतात.... नातेवाईक तऱ्हेवाईकपणा कर...

retirement

*जगणे आता उत्सव व्हावे,* *क्षण क्षण हे भरभरून जगावे,* *पैसाअडका याहीं पेक्षा,* *फक्त आनंद हेच ध्येय असावे.* *तो रुसला का? ती फुगली का ?* *तिथल्या तिथेच सोडून द्यावे,* *सॉरीची ती कुबडी घेऊन,* *नात्याला त्या उचलून घ्यावे.* *कुणी वागला कसे जरीही,* *देवाला न्यायाधीश करावे,* *सोडुन द्यावे दुखरे क्षण अन,* *जगणे हे आनंदी करावे...* *इंदिरा संत...*🙏 *Happy Morning*🌞

रिटायरमेंट

रिटायरमेंट ? -  Nothing but just second inning  !!... ----------------------------------------------------------------- ग्रिव्हज कंपनीत मी जवळपास १५ वर्षे काम केले आहे...  गेल्या २-३ वर्षांत माझे बरेचसे सहकारी व समकालीन मंडळींचे ' Retirement -  सेवानिवृत्ती ' अशा शिर्षकाचे फोटो what's up ग्रुपवर येत असतात, तेंव्हा मला प्रश्र्न पडतो की खरंच ह्याला रिटायरमेंट म्हणायचं ? व्यक्ती रिटायर होते का ? व्हायला पाहिजे का ?  मला वाटते - नाही ... म्हणून मी त्यांना शुभेच्छा देताना लिहीत असतो - "  Friends, All the best for your second inning !! " * * * *  फ्रॅन्कफर्टला जाताना विमानात पंचविशीतला  एक भारतीय तरुण भेटला.. गप्पा मारता मारता मी त्याला सहजच विचारलं की - '' आजपासून २० वर्षांनी तु स्वत:ला कुठे पहातोस ?'' -(Where do you see yourself after 20 years ?) मी काही मॅनेजमेंट कन्सलटन्ट नाही पण हा प्रश्न आजकाल बहुतेक सर्व ठिकाणी सर्रास विचारला जातो.. तो हसत म्हणाला, -" खुप पैसे कमवीन..रिटायर होऊन बहामात वगैरे हाॅलिडे करत असेल...ऐश.. Enjoy !!..'' मला आश...

फक्त प्रेम करा

फक्त प्रेम करा सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी  नेमकं काय असतं हे "सख्ख प्रकरण?"  सख्खा म्हणजे आपला सखा. सखा म्हणजे जवळचा जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केंव्हाही, काहीही सांगू शकतो. त्याला आपलं म्हणावं,  त्याला सख्ख म्हणावं ! सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावरपण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्य नसते पथ्य असते. ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो,  मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं ! ज्याच्याकडे गेल्यानंतर  आपलं स्वागत होणारच असतं  आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं अपमानाची तर गोष्टच नसते  फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते ! पंढरपूरला गेल्यावर  विठ्ठल म्हणतो का ..... या या फार बरं झालं ! माहूर वरून रेणुका मातेचा  किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून ! मग आपण का जातो ? कारण भ...

अच्छे दिन

लेख मोठा असला तरी चिंतनीय आहे वाचकाच्या पाहिजे.  याचाअज्ञात लेखक कोण? हे कळले तर आवश्य कळवा. ------------------------------------------------- *शेवटी पंतप्रधान कुणीही असो 'अच्छे दिन' तोपर्यंत आणू शकत नाही, जो पर्यंत जनता साथ देत नाही ..!!* *रोज या वर्तमानपत्रांना फक्त राज ठाकरे, उद्धव ठाकरे, भुजबळ, पवार, फडणवीस हेच कां दिसतात ..? यांना नवीन होणारे प्रकल्प कां दिसत नाहीत ..? यांना, देशात नवीन पिढी चमत्कार घडवते आहे, हे कां छापता येत नाही ..?* *किती जणांना माहित आहे ओयो / हाईक या नव्या अॅप्स बद्दल ..? ओयो बनवणारा फक्त २३ वर्षांचा कोवळा मुलगा आहे आणि एकहाती त्याने ६०० कोटींचा व्यवसाय सुरु केला आहे .. तेही कुठल्याही मदतीशिवाय ..!! पण आमच्या वर्तमानपत्रांना हे दिसत नाही .. रेडबस ही ७०० कोटींची अॅप्स बनवणारे तिघे फणींद्र साम, सुधाकर पुसूंपुनेरी, चरण पद्मराजू हे हैद्राबादचे, पण कोणालाच माहित नाही. पी. सिंधु चीनमध्ये जाऊन चिनी जमिनीवर, त्यांच्याच, जगातल्या क्रमवारीतील क्रमांक १ ला हरवून आली ..!! पण कोणीही छापत नाही. ह्यांना फक्त तेंडुलकरच दिसतो ..!! मग बाकीचे कुचकामी कां ..?* *कारण देश...