रिटायरमेंट

रिटायरमेंट ? - 
Nothing but just second inning  !!...
-----------------------------------------------------------------
ग्रिव्हज कंपनीत मी जवळपास १५ वर्षे काम केले आहे... 
गेल्या २-३ वर्षांत माझे बरेचसे सहकारी व समकालीन मंडळींचे ' Retirement -  सेवानिवृत्ती ' अशा शिर्षकाचे फोटो what's up ग्रुपवर येत असतात, तेंव्हा मला प्रश्र्न पडतो की खरंच ह्याला रिटायरमेंट म्हणायचं ? व्यक्ती रिटायर होते का ? व्हायला पाहिजे का ? 
मला वाटते - नाही ...
म्हणून मी त्यांना शुभेच्छा देताना लिहीत असतो - "  Friends, All the best for your second inning !! "
* * * *
 फ्रॅन्कफर्टला जाताना विमानात पंचविशीतला  एक भारतीय तरुण भेटला.. गप्पा मारता मारता मी त्याला सहजच विचारलं की - '' आजपासून २० वर्षांनी तु स्वत:ला कुठे पहातोस ?'' -(Where do you see yourself after 20 years ?)
मी काही मॅनेजमेंट कन्सलटन्ट नाही पण हा प्रश्न आजकाल बहुतेक सर्व ठिकाणी सर्रास विचारला जातो..
तो हसत म्हणाला, -" खुप पैसे कमवीन..रिटायर होऊन बहामात वगैरे हाॅलिडे करत असेल...ऐश.. Enjoy !!..''
मला आश्चर्याचा धक्का वगैरे काही बसला नाही कारण आजच्या पिढीचे थोड्या बहुत फरकाने हेच उत्तर असते की वयाच्या चाळीसाव्या वर्षांपर्यंत भरपूर पैसा कमवायचा अन् रिटायर व्हायचं , Enjoy करायचं ...बस्स ...
* * * *
फ्रॅन्कफर्टला उतरलो, पुढे ४-५ तास रेल्वे प्रवास होता..
रेल्वेत ६५-६६ वर्षे वयाचा एक वयस्क इटालियन भेटाला.. तो अजून ही कारखान्यात कामगार म्हणून काम करत होता... नंतर मला कळले की इटली मध्ये निवृत्तीचं वय ६७ आहे...
मी म्हणालो, -" आमच्या कडे ५८ ला आम्ही रिटायर होतो- म्हणजे रिटायर केले जाते.." 
तो म्हणाला - " Then what you people are  doing after retirement ? .."
मी - " बहुतेक जण काही करत नाहीत ... Just carrying on life as it comes .."
" अरेरे, wrong...मानवी शरीर हे बसून रहाण्यासाठी नाही बनलेले... माणूस active राहीला तर दिर्घायुष्य लाभतं..."
मी विचार करू लागलो आणि जसजशी उदाहरणे डोळ्यासमोर येऊ लागली तसतसे त्याचं म्हणणं मला पटू लागले....
* * * *
पद्मविभूषण श्री. रतनजी टाटा..
(मी ही पोस्ट लिहितो आहे तोपर्यंत तरी त्यांना ' भारतरत्न ' ने सन्मानित करण्यात आलेले नाही पण माझ्या सारख्या करोडो लोकांच्या सदिच्छा आहेत की त्यांना ते मिळावे.)
आज (२०२१) मध्ये रतन टाटा ८४ वर्षांचे आहेत..ते वयाच्या ५२-५३ व्या वर्षी टाटा ग्रुपचे चेअरमन बनले..२२ वर्षे म्हणजेच वयाच्या पंच्याहत्तरी पर्यंत हे पद त्यांनी सांभाळलं, पुन्हा २०१६-१७ मध्ये काही दिवस त्यांनी interim chairman म्हणून काम पाहिले..
आज ही ते टाटा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम करत आहेत, किती तरी startups ला त्यांनी वित्तीय सहाय्य देत प्रोत्साहन दिले आहे...
आज ही रतन टाटा आपल्या ग्रुपच्या वार्षिक सर्वसाधारण मिटींग कशा प्रकारे अटेंड करतात, त्यांचं daily routine कसं असतं, किती व्यस्त असतं, How he manages all these things  हे ऐकलं , वाचलं की लक्षात येतं की हे तर सगळं तरुणांना देखील लाजवील असंच आहे...
रतनजी टाटा यांच्या कडे पाहीले की वाटते - रिटायरमेंट ? - No, it's just second inning !!
* * * *
मी बागला ग्रुप मध्ये ही बरीच वर्षे नौकरी केली..
बागला ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन श्री. राज नारायण बागला यांनी  १९८५ मध्ये वयाच्या ६० व्या वर्षी औरंगाबाद येथे केवळ ५ लाख रुपयांच्या भांडवलावर  कंपनीची सुरूवात केली आणि वयाच्या अखेरपर्यंत म्हणजे ८३ वर्षांपर्यंत ते कार्यरत होते.. काही वर्षे मला त्यांच्या बरोबर काम करायला मिळाले..ते सकाळी साडे दहाच्या सुमारास कंपनीत येत...स्टाफ बरोबर मिटींग्ज् घेत, डेव्हलपमेंट वगैरेंच्या चर्चेत पुर्णवेळ बसत आणि अंदाजे सहाच्या सुमारास आॅफीस सोडत...
हा दिनक्रम त्यांचा वयाच्या ८३ वर्षांपर्यंत असाच होता..ते निवर्तले तेंव्हा कंपनीचा ग्रुप टर्न ओव्हर ५०० कोटींच्या पुढे होता..
( बागलाजी औरंगाबाद येथे कंपनीची सुरूवात करण्यापूर्वी ही कलकत्ता, जबलपूर वगैरे ठिकाणी काही लहान मोठे उद्योग करत होते)
म्हणजेच काय ? - तुम्ही रिटायर झालात म्हणजे तुमचा एक प्रोजेक्ट संपला एवढेंच ..आता दुसरा !!...
* * * *
अमिताभ बच्चन...
पुढच्या वर्षी ८० वर्षांत पदार्पण करतील...
And still going strong ...
अमिताभ बच्चन बद्दल हजारो चाहते लिहीत असतात, २०१९ च्या एका दिवाळी अंकात मी ही " बिग बी - ५० नाॅट आऊट " हा लेख त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत ५० वर्षे पुर्ण केली त्या निमित्ताने लिहिला होता...
सद्या ' कौन बनेगा करोडपती ' ह्या हिंदी रिअॅलिटी शो चा २१ वा सिझन सुरू आहे...
२००० सालात सुरू झालेल्या ह्या कार्यक्रमाची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे असे लक्षात येते..
३ डिसेंबर २०२१ रोजी ह्या खेळाचा १००० वा एपिसोड होता..ह्या एपिसोडमध्ये बोलताना भूतकाळातील आठवणीने अमिताभ बच्चन भाऊक झाले होते... म्हणाले ,-" मी मोठ्या पडद्यावर काम करत होतो पण एक वेळ अशी आली की मला काम मिळत नव्हते, तेंव्हा २००० साली मी कौन बनेगा करोडपती हा टेलिव्हिजन वरचा , छोट्या पडद्यावरील, कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला...लोक त्या वेळी माझ्या ह्या निर्णयावर शंका घेत होते, मला ही खात्री नव्हती पण परिस्थिती बदलली आणि आज २१ वर्षे मी हा कार्यक्रम करतो आहे...
ह्याच कार्यक्रमात ३-४ आठवड्यांपूर्वी रोहित शेट्टी आला होता, त्यावेळी अमिताभ यांनी त्याला विचारलं की बाबा रे मला ही तुझ्या सिंघम् फ्रेंचायजी मध्ये काम असेल तर बघ ना....
आज ७९-८० व्या वर्षी अमिताभ बच्चन आपल्या मुलांपेक्षा ही जास्त बिझी दिसतात...
आणखी एक उदाहरण .........
रमेश देव ....
हे नाव माहीत नसलेला मराठी माणूस मिळणं अवघड..
२८५ हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट,३० मराठी नाटकं आणि २०० वेगवेगळ्या शो मधून काम करणाऱ्या ९२ वर्षांच्या तरुणाला परवाच अशोक सराफ बरोबर ' जीवन संध्या ' ह्या मराठी सिनेमात पाहीले...
९२ वर्षे खणखणीत ...
आणि असलं काही बघितले की रिटायरमेंट हा  शब्दच  बाद वाटतो...
* * * *
अडवानीजी...
श्री.लालकृष्ण अडवानी...
आज वय वर्षे ९४, पण वयाच्या ९२ व्या वर्षांपर्यंत ते लोकसभेत खासदार होते आणि नियमितपणे संसदेच्या कामकाजात भाग घेत..
श्री.शरद गोविंदराव पवार...
वय वर्षे ८१..
कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झगडत, पायाला पट्ट्या बांधून आजही ही पुर्णवेळ राजकारणात कार्यरत आहेत... तरुणांना लाजवेल असे दौरे करतात, सभा घेतात.....
सत्तेच्या मॅरेथॉन मध्ये धावणाऱ्यांना वयाची अट नसते हे जरी खरं असलं तरी धावण्याची उर्मी ही वैयक्तिक असते म्हणजे असावी लागते तरच गडी धावू शकतो...
* * * *
पोस्ट मध्ये आपण ६ उदाहरणं पाहीली...
उद्योग करणाऱ्यांना बऱ्याच वेळा अपयश येते, उद्योग बंद करावे लागतात... टाटांनी ही आपले काही उद्योग विकून टाकले, काही नवीन सुरू केले पण थांबले नाहीत...
सिनेकलावंत यांचं क्षेत्र तर अतिशय बेभरवशी... कुठल्याही कलावंताचे उदाहरण घ्या, त्यानं अपयश अनुभवले नाही असं नाही तरीही ते काम करत राहिले, पुढे पुढे जातच राहिले...
राजकारणाबद्दल तर बोलायलाच नको, आजकाल बहुतेक सगळेच राजकारण जवळून follow करतात...
म्हणुनच ...
Voluntary Retirement, Compulsory Retirement (सक्तीची निवृत्ती) किंवा Retirement due to age limit वगैरे काही ही मानण्याचे कारण नाही ....
Human mind is very powerful... It is your key to health, success and happiness. 
 प्रसिध्द अमेरिकन रिअॅलिटी शो अॅन्कर, TV producer, author, activist  Oprah Winfrey once said, - "You don't become what you want, you become what you believe."
म्हणूनच मला वाटतं की - Retirement ?? - No - No , it's just a second inning !!
आयुष्याच्या खेळात समस्या सोडवण्यासाठी कुठलाही set formula असत नाही, असं असलं तरीही उर्वरित आयुष्य सुसह्य करण्यासाठी प्रत्येकाने नवीन ईनिंग सुरू केली पाहिजे..  खेळली पाहिजे ...
---------------------------------------------------------------------
©️ शरणप्पा नागठाणे.

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार