सहावे सुख
*सहावे सुख-*
चिनी लोकांमध्ये म्हणे एक गोड प्रथा आहे.अभिष्टचिंतन करताना 'तुम्हांला सहा सुखे मिळोत' असं ते म्हणतात. आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार, चांगली मुले ही पाच,
पण मग ते सहावे सुख कोणते?
ते त्याचे त्यानेच शोधून काढायचे असते आणि ते त्याला सापडावे, असं अभिष्टचिंतन करणारा म्हणत असतो. या सहाव्या सुखाची कल्पना किती वेगळी आणि अर्थपूर्ण आहे!
आयुष्य सुखसमाधानात जावे म्हणून आपण कितीतरी गोष्टी जीव तोडून करतो पण हे करत असताना काहीतरी वेगळं हवं असतं जे फक्त आपल असत म्हणून हे सहावं सुख, चिनी माणसानं गृहीत धरले आहे.
हे सुख प्रत्येकाचं वेगळं. कुणाचं छोटं, कुणाचं मोठं... एखादा छंद जोपासणं, छान वाचायला मिळणं, आवडीची गोष्ट होणं, मनातला जीवलग भेटणं किंवा हे आवडतंय, याचा शोध लागणं म्हणजे सहावं सुख...
धकाधकीच्या जीवनात स्वत:चे अस्तित्व विसरलेल्या व्यक्तिला मायेचा व मनमोकळ करता येणारा कप्पा मिळणे हे सहावे सुख
एका कवितेत केशवसुत म्हणतात,
चुकचुकल्यापरि,
होऊनि अंतरि,
बघे बावरी,
माझे मज लाभेल कसे,
परि न हरपले ते गवसे.
असे हे सहावे सुख. आपल्यातच कुठेतरी दडून बसलेले, त्याचा शोध लागायचा कसा? तो ज्याचा त्याला आपोआप लागतो. तसा तो लागण्यातच खरी गंमत!!
Comments
Post a Comment