शेवटची ओव्हर...जीवनाचा सार
*शेवटची ओव्हर...जीवनाचा सार..* 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता...... खरं सांगू...ही ओव्हर मला त्या गीतेसारखी वाटली.....जीवनाचा सार सांगणारी.... काय नव्हतं ह्या ओव्हर मध्ये... माणसाचं सगळं जीवन ही ओव्हर अधोरेखित करून गेली... ---------------------------------------- 6 चेंडू 16 धावा.. पहिल्या चेंडूवर हार्दिकची हाराकीरी... आयुष्यात सगळ्याच प्रसंगांना आडव्या बॅटने उत्तर देऊन नाही जमत... हार्दिक इथेच फसला...शिवाय समोरच्याला सहज घेण्याची वृत्ती हार्दिकला नडली.... ---------------------------------------- 5 चेंडू 16 धावा... कार्तिक स्ट्राईकला...एक धाव काढून विराटकडे स्ट्राईक दिली...विराटने आधीच्याच ओव्हरला गियर बदलले होते...आयुष्यात असा मनाचा मोठेपणा दाखवला तर बऱ्याच समस्या सुटतात...एखाद्याला ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे स्ट्राईक द्या ओ.... तो तुम्हालाही विजयी करेल... ---------------------------------------- 4 चेंडू 15 धावा... तिसऱ्या चेंडूवर विराटच्या दोन धावा... पण त्याचं खरं श्रेय जातं कार्तिकला...किती जिवाच्या आकांताने धावला....खरं सांगू आपल्याला आयुष्यात विजयी व्हायचं असेल तर कार्तिक ...