कर्म कसे असावे
*कर्म कसे असावे ?*
*देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात.*
*नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते.*
*समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे.*
*दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही.*
*माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पत्र नाही.तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते.*
*जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस अंतर मनात जळतो.*
*जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाची वाट बघत नाही.*
*जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे.*
*ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम फळच... देतो.*
*हे चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. आचरण तर परमात्म्या पर्यंत घेऊन जाते.*
*🌺🙏धन्यवाद 🙏🌺*
@निलेश प्रकाश ठाकूर,(रचना विद्यालय),नाशिक.
Comments
Post a Comment