साम टीव्ही वरील चर्चेत

सोमवारी साम टीव्ही वरील चर्चेत संघविचारकांच्या खालील विधानांवर मनसोक्त हसलो
खोटं एवढ्या आत्मविश्वासाने तेही कोट्यवधी लोक टीव्हीवर आपल्याला पाहत असताना बोलणं सोपी गोष्ट नाही...

त्त्यांची काही विंनोदी विधाने पाहू
1)देशात फक्त राष्ट्रीय स्वयंसवेक संघच गांधीजींचे विचार पाळतो😂😂(गांधीजी वाईट होतेना?, त्यांनी देशाचं वाटूळ केलं , देशाला नामर्द बनवलं वगैरे सारसंघसंचालक गोळवलकर गुरुजी म्हणत होते त्याचे काय?)
2) संघ नथुराम गोडसेला मानत नाही.😂😂(मग ते बिचारे स्वयंसेवक जे एवढा जीवाचा आटा पिटा करून नथुरामचे वध बिध वाले मेसेज पाठवतात त्यांचे काय?)
3) गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी भावनेच्या भरात दिली गेली .😂😂(प्रथमतः सुभाषचंद्र बोस आणि त्यानंतर कोट्यवधी लोक भावनिक होते का तशी त्यांना राष्ट्रपिता म्हणायला?)
स्वतःला जगातील सर्वात मोठी संघटना म्हणणाऱ्या आणि 90वर्षे गांधीद्वेष करणाऱ्यांना स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणावे लागते बहुमतात येऊनही यांच्या थोर नेत्याला आजही जगभर फिरतांना अजूनही गोळवलकर, सावरकर, हेडगेवार नव्हे तर गांधी हे नावच आपल्या प्रत्येक भाषणात घ्यावे लागते.यातच गांधीविचारांचा विजय दिसून येतो.

https://www.facebook.com/100001231821936/posts/pfbid0Bw6uQAamhDk2N4qaC6c6PRHsxpwanMWWrejY7F2FJp4LPY4H7Gygt5DSVWWyJ3Pcl/

चर्चेत संघविचारक श्रीपाद कोठे, हिंदुत्ववादी कोचरेकर आणि भाजपचे हाके यांनी नेहमी प्रमाणे चर्चा भरकटवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
तुषार गांधी सर, अन्वर राजन सर , विकास लवांडे आणि राजरत्न आंबेडकर यांनी खूप महत्वाचे मुद्दे मांडले संजय आवटे सरांनी नेहमी प्रमाणे सुरवात व शेवट अप्रतिम केल्याने कार्यक्रमाला चार चांद लागले.
मी संघाबद्दल जेव्हा काही मुद्दे मांडले तर हे संघवीचारक त्याला उत्तर किंवा मूळ मुद्द्यावर बोलायचं सोडून सडका मेंदू, विकृत वगैरे म्हणून माझं चरित्रहनन करू लागले आणि सभात्यागाची धमकी देऊ लागले.शाखेत काठ्या फिरवण्यासोबतच असा पळपुटेपणा आणि चरित्रहनन पण  शिकवल जात असाव, पोंक्षेसारखे तेही पळून जाऊ नयेत म्हणून शांत बसलो.

असो चर्चेतील मुद्दे जे काल वेळे अभावी तेथे पूर्णपणे मांडता आले नाही ते पाहू या

1.देशात फक्त राष्ट्रीय स्वयंसवेक संघच गांधीजींचे विचार पाळतो-

स्वतःला जगातील सर्वात मोठी संघटना म्हणणाऱ्या आणि 90वर्षे गांधीद्वेष करणाऱ्यांना स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणावे लागते यातच गांधीविचारांचा विजय दिसून येतो.यांच्या थोर नेत्यालाही जगभर फिरतांना अजूनही गांधी हे नाव आपल्या प्रत्येक भाषणात घ्यावेच लागते.

संघाची स्थापनाच गांधींच्या कल्पनेतील भारत नाकारण्यासाठी झाली होती. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता, आधुनिक, लोकतांत्रिक, समताधिष्टीत भारत निर्माण करणे हा गांधींच्या कल्पनेतील भारत, ज्याला अलीकडे ’आयडिया ऑफ इंडिया’ म्हणून संबोधले जाते.त्या आयडिया ऑफ इंडिया’ ला संघाने आत्तापर्यत तीव्र विरोध केलेला आहे.

गांधीजी सत्याला ईश्वर मानायचे. त्यामुळे सत्य त्यांच्यासाठी प्राणाहून प्रिय होते. याउलट संघ गरजेनुसार असत्याचा आधार घेता व गनिमी कावा किंवा चाणक्य नीती म्हणून त्याचे समर्थन करतो.
 यातच गांधींचा प्रभाव समजून येतो.
गोळवलकर गुरुजींच्या भेटीनंतर महात्मा गांधीजींनी गोळवलकर गुरुजी व रा. स्व. संघ याबद्दलचे त्यांचे मत नेहरूंकडे व्यक्त केले होते. नेहरूंनी सरदार पटेलांना लिहिलेल्या एका पत्रात ते उदधृत केले आहे. नेहरू लिहितात : "बापूंनी श्री. गोळवलकरांच्या पहिल्या भेटीनंतर सांगितल्याचे स्मरते की त्यांनी (गोळवलकरांनी) काहीशी छाप टाकली हे खरे; पण मी त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाही. त्यांच्याशी झालेल्या दुसर्या व तिसर्या भेटीनंतर मात्र प्रतिकूल मत व्यक्त करून बापू म्हणाले, यांचा काही भरवसा देता येत नाही. ही मंडळी बोलताना समजूतदार, वाजवी भासतात. पण नंतर बोलल्याच्या नेमके उलट वागण्यात त्यांना कसलाही खंत, खेद वाटत नाही. माझंही मत तसंच झालं आहे."
गांधीजींनी रा. स्व. संघाला ‘हुकुमशाही प्रवृत्तीची सांप्रदायिक संस्था’ म्हटले. गोळवलकर यांनी गांधीजींना ‘हिंदू धर्मातील महान पुरुष’ असे संबोधले होते, त्यावर गांधीजी म्हणतात, ‘‘मी हिंदू आहे जरूर, परंतु माझा हिंदू धर्म असहिष्णु नाही आणि बहिष्कारवादीही नाही. माझ्या मते हिंदू धर्म हा समावेशक आहे व सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी हिंदू धर्माने आत्मसात केल्या आहेत.’’

2)संघ नथुराम गोडसेला मानत नाही

नथुराम हा संघाचा स्वयंसेवक होता हे स्वतः गोडसेचे भाऊ गोपाळ गोडसे यांनी आणि आत्ता हयात असलेले सावरकर आणि गोडसे यांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी केली होती.सरदार पटेल यांनी संघावर बंदी त्यामुळेच आणली होती.सरदार पटेल यांच्या पत्रात ही संघाच्या विषारी वातावरणामुळे गांधीहत्या झाली याची स्पष्ट नोंद आहे ज्यामुळे सरदार पटेलानी संघावर बंदी ही घातली होती.
गोडसेप्रमाणेच हिटलर हे त्यांचे मुलभुत आदर्श आहे हे आता लपुन राहिलेले नाही. एकतंत्रशाही त्यामुळे त्यांना प्रिय आहे. मुस्लिमांचा हे पराकोटीचा द्वेष करतात, इतका कि हिटलरने ज्युंचा जसा वंशौच्छेद केला तसा मुस्लिमांचाही करावा हे यांचे स्वप्न आहे, तसे प्रयत्न आहेत.

3)गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी भावनेच्या भरात दिली गेली.-
गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणा ऐऱ्या गैरया माणसाने भावनेच्या भरात दिलेली नसून भारताचे थोर सुपुत्र व स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना तसे संबोधले आहे.आणि फक्त ती त्यांनी दिली एवढेच नव्हे तर देशातील कोट्यवधी लोकांनी ती स्वीकारली ही होती
राष्ट्रपिता का?
गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला. अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला. गांधीजींनी कृश आणि दुबळ्या हाताने मूठभर मीठ उचलले आणि एका बलाढय़, गौरवशाली साम्राज्याचा पाया खचून गेला. कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तन-मन-धनाची प्रेरणा त्या कृश आणि दुबळ्या हातांत एकवटली होती. गांधींनी राष्ट्रही जागविले आणि नवा राष्ट्रवादही जागविला. म्हणूनच सर्वच बाबतीत विभिन्नता असलेल्या देशात सर्वाना राजकीय, सामाजिक आणि आíथक समतेच्या संधी देणाऱ्या एका सेक्युलर संविधानाची, एका आधुनिक नव्या राष्ट्राची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे गांधी राष्ट्रपिता ठरतात.
सावरकर आणि रा. स्व. संघाचा राष्ट्रपिता आणि राष्ट्रध्वज याबद्दलचा अनादर-प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्यात हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत." म्हैसूर हे हिंदू संस्थान होते. या संस्थानात कोंग्रेसी सत्याग्रहींनी तिरंग्याला अभिवादन केले म्हणुन २६ सत्याग्रहींना संस्थाने पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. यावर १७ एप्रिल १९४१ रोजी सावरकरांनी शिमोगा येथील हिंदू महासभेच्या कार्यकारिणीला पत्र लिहिले, त्यात स्पष्टपणे म्हटले कि, "म्हैसूर राज्य हिंदू सभेने हिंदू संस्थानिकांचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत अहिंदू अथवा वाट चुकलेल्या राष्ट्रवादाचे सोंग आणना-या हिंदुंना विरोध केला पाहिजे." याच वर्षी, म्हणजे २२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणाले, "हिंदूडम (हिंदू जगत) उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिकासहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे...तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल

4)भारताची फाळणी गांधीजीनी केली का?

फाळणीला गांधीजींची मान्यता नव्हती व ती टाळण्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले हा इतिहास सर्वश्रुत आहे. देश जेव्हा स्वातंत्र्यदिन साजरा करत होता तेव्हा गांधीजी एकाकीपणे कलकत्ता-नौखालीत दंगली शमवत, हिंदू-मुस्लिमांचे अश्रु पुसत होते, आपला प्राण पणाला लावत होते.आणि त्यांचे आतले बळही असे, की त्यांच्या अस्तित्वाने दोन-तीन दिवसांत दंगल शांत झाली.त्यांना स्वराज्यापेक्षाही माणुसकीचा धर्म मोठा वाटत होता. हा इतिहास सोयीस्करपणे विसरायला लावून गांधीजींना फाळणीचे गुन्हेगार ठरवण्याचे काम संघपरिवाराने कायमच केलेले आहे. तो संघपरिवार, ज्याचा स्वातंत्र्यलढय़ात तर सहभाग नव्हताच, उलट ब्रिटिशांना साथ देण्यापासून तर द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताच्या आधारे फाळणीसंदर्भात जिनांसारखीच भूमिका घेत होता.
माउंटबॅटन यांनी गांधींना बाजुला ठेवुन आम्ही फाळणी करण्यात कसे यशस्वी झालो हे त्यांच्या लंडनमधील एका भाषणात सांगितले आहे.
जीनांनी आपल्या शेवटच्या आजारपणात आपल्या डॉक्टरांकडे एक उल्लेख केलाय. त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्य़ातील सर्वात मोठी चुक कोणती ? त्यांनी उत्तर दिलं - "डीव्हीजन ऑफ इंडीया" ! त्या डॉक्टरांचं नाव आता आठवत नाही, पण त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

5)भगतसिंगची फाशी आणि गांधीजी-

 भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून अनेक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे.
भगतसिंग सशस्त्र क्रांतीकारक व कम्युनिस्ट होता म्हणून तो गांधींच्या विरोधात होता आणि म्हणून तो हिंदूत्ववादी होता, असा प्रचार धादांत खोटा होता. भगत सिंग आणि त्याच्या सहकार्यांना वाचविण्याचा जो कांही प्रयत्न केला तो गांधी-पटेल-नेहरूंनीच केला मात्र आज भगतसिंग आमचा आहे म्हणणा-या कोण्याही हिंदुत्ववादी पक्षातील नेत्यांनी असा कोणताही प्रयत्न केला नाही आणि  महत्वाचे म्हणजे भगतसिंग आणि त्याचे सहकारी हौतात्म्यासाठी खूपच अधीर झाले होते . त्यांना माफी नकोच होती ,म्हणून तर त्यांनी खटल्या दरम्यान बचावाचा प्रयत्न केला नाही. संघाचे संस्थापक हेड्गेवारांनी अनेक तरुणांना भगतसिंगाचा मार्ग चोखाळण्यापासुन परावृत्त केले होते.
शहीदे आजम भगतसिंहनी आपल्या 'नये नेताओंके अलग अलग विचार' या पुस्तकात नेताजी बोसना emotional Bengali, a devotee of the ancient culture of India तर नेहरुंना  internationalist and revolutionary असे म्हटले आहे.भगतसिंगांनी गांधीजींच्या अस्पृश्यतानिवारण मोहिमेचे ही कौतुक केले आहे.

५५ कोटी आणि गांधीजी-

भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २५ कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावीच लागणार होती नाहीतर आंतरराष्ट्रीय(UNO) दबाव येऊन भारताला ते द्यावेच लागले असते भारताची जगभर नालस्ती झाली असती असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण 55कोटीं देण्याचे सरकारने मान्य केल्यावरही अनेक दिवस गांधीजींचे उपोषण चालू होते जे सामजिक सलोखा निर्माण करणे व दंगली थांबवणे हे होते
शिवाय हे 55 कोटी रुपये सुद्धा पाकीस्तानला केंव्हाही दिले गेले नाही. पाकीस्तानकडील डँकोडा विमाने व कांही दारूगोळा यात घसारा न काढता ही रक्कम समायोजीत करण्यात आली.

गांधीहत्येचे समर्थन करतांना वरील 55कोटी आणि फाळणी असे वरील दोन खोटे मुद्दे वापरले जातात  गांधीजींनी हे  राष्ट्र  शतकानुशतके राजकीयदृष्ट्या झोपलेल्या बहुजनांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करून लोकशाही स्थापित करून त्यांच्या हाती हे सोपवले. त्यामुळे सनातनी चिडले होते .आणि हत्या त्यामुृळे झाली होती.

लाल बहादूर शास्त्रीची का आठवण नाही-हिंदुत्ववादी कोचरेकरांनी हा मूर्खपणाचा प्रश्न विचारलाच शिवाय याच दिवशी अनेक #नमोभक्त मुद्दामून फक्त लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या शुभेच्छा पाठवत होते(गांधीला आम्ही तुच्छ लेखतो दाखवण्यासाठी).
- लाल बहादूर शास्त्री हे गांधीजींचे पट्टशिष्य होते त्यांच्यावर शेवटपर्यत गांधीजींचा प्रभाव होता शिवाय या भक्तांचा आमचे त्यांचे मुख्य नेते अनेकदा जाम #पोपट करतात बघा 
2ऑक्टो 2015ला यांचे नेते गांधी समाधीवर गेले पण लाल बहादूर शास्त्री समाधीवर गेलेच नाहीत ना त्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली

असो
कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .

कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.

सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते

बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते ....... चाफ़ेकर , खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते त्या वेळी हे फक्त हातात काठ्या घेवुन पाडव्याचे संचलन करत होते

लोकांना देवा धर्मावरुन जातीपातीवरुन भडकवत होते

तेव्हा संघटना म्हणून हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या  या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?

मग ज्या लढाईत आपण भाग घेतलाच नाही त्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांचे असणारे मतभेद ( जे वैचारिक असतील , मार्गाबद्दल असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते ) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क ह्या संघटनांना कसा मिळतो ?

आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारले तर उत्तर सापडतील पण कबूल करण्याची हिंमत असायला पाहिजे.

#GandhiForever
संकेत मुनोत
संदर्भ-
1.सिलेक्ट कॉरस्पॉन्डन्स ऑफ सरदार पटेल-१९४५-५० भाग २ सं. व्ही. शंकर, नवजीवन, अहमदाबाद
2.या मखलाशीचे कौतुक कुणाला?-सुनीती सु.र.
3.सावरकरांचा अखंड हिंदू राष्ट्रवाद...?-संजय सोनवणी
4.भगतसिंग फाशी-राज कुलकर्णी
5.संघाची 90 वर्षे- रमेश ओझा
6.गांधीजी समज गैरसमज-अशोक चौसाळकर
7.लोकमत लेख-संकेत मुनोत
8.संघ आणि गांधी -डॉ अभय बंग
9.इतर अनेक ऐतिहासिक संदर्भ
कार्यक्रमाची लिंक  comment मध्ये

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार