Posts

Showing posts from October, 2019

negative thoughts

कलुषीत विचारांची दिशा... करते आरोग्याची दशा .... लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात म्हणजे वयाच्या 5 ते 15  वर्षांपर्यंत त्यांच्यावर बलात्कार झाले, भरपूर शारीरिक अत्याचारही झाले. त्यामुळे त्यांचा जीवनाकडे व अवतीभवती बघण्याचा दृष्टिकोनच बदलला तो इतका नकारात्मक होता की हे संपुर्ण जग वाईटच आहे. सर्व पुरुष हे घाणेरडे आसतात व मी जगायला लायक नाही. पुढे ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ झाल्या व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके त्यांनी वाचली. पुढे वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात यें की, ज्यांनी आपल्याशी वाईट कृत्य केले ते ते करून निघूनही गेले; याचा त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. पण त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय ?तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? आपल्या दृष्टीने तर नक्कीच नाही. तरीही ‘लुईस हे’ यांनी त्यांना मनापासुन माफ़ कराय...

नमस्कार आपली संस्कृती

●● *नमस्काराचे महत्व* ●● ● *महाभारताचे युद्ध सुरु होते.*     *दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे*    *मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*    *ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून*     *देखील त्यांच्या सेनेची सतत हानी*     *होत होती..* ● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर*     *व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन*     *भीष्म पितामह घोषणा करतात की..* ● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."* ● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या*     *शिबिरात पोहोचताच पांडवांची*     *अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या*     *क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..* ● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल*     *झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या*     *लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..*  ● *"माझ्या सोबत चल.."* ● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण*     *पितामहांच्या कक्षात पोहोचले.*     *ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर*...

दुसरं आयुष्य

आज मी माझी सरलेली वर्ष मोजली आणि अचानक लक्षात आलं .. अरेच्चा! जेवढं जगून झालंय त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं.. मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना.. खूप आवडीचा खाऊ खाताना.. तस...

जगण्याचं सूत्र चुकतंय का

*जगण्याचं सूत्र चुकतंय का ?*           भाऊ काय बहीण काय           नुसता फापट पसारा,            कोण कोणाला विचारतंय           कुणालाही विचारा ... कुणी कोणाकडे जाईना कुणी कुणाकडे येईना,  जग...

श्लोक मनातले

श्लोक मनातले जनी सर्व सूखी असा तोचि एक | जयाच्या नशीबी मस्त गाढ झोप || सकाळी जयाचे पोट साफ होते | आभार ईश्वराचे तो  नित्य माने || अनंता तुला मागणे हेचि आता | पहिला चहा रोज आयता मिळ...

दिवाळीचे दिवस

*गव्हर्नमेंट Colony मधील दिवाळी*  वडील पोलीस , त्यामुळे वयाची ४० वर्ष पोलिस कॉलनीतच गेली. आता आम्ही  कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे,... सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद. एकाच्या घरात काय चाललंय ते बाजूच्या फ्लॅटवाल्यांंनाही समजत नाही, इतकी प्रायव्हसी जपली जाते. असो.  तर, माझ्या शाळकरी वयात आम्ही गव्हर्नमेंट कॉलनी, बांद्रा पुर्व येथे राहायचो. एका मजल्यावर ५ ते १०  खोल्या. आणि सर्वांना मिळून एकच  सामायिक (common) गॅलरी. सर्व खोल्यांचे दरवाजे उघडलेले  असायचे. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे ते रात्री अकरा बारा वाजताच बंद व्हायचे. स्त्री वर्गापैकी कोणीही कोणाच्याही घरात बिनदिक्कत ये-जा करायचं. एका शेजारच्या घरातील वस्तू, पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही विधिनिषेध किंवा औपचारिकपणा नव्हता. बऱ्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटूंबं. म्हणजे कोणाची भांडणं व्हायची नाहीत अशातला प्रकार नव्हता, परंतु अशी भांडणं फार दिवस टिकायची नाहीत. आमच्या गव्हर्नमेंट कॉलनीत सर्व सण अगदी धूमधडाक्यात साजरे व्हायचे. आणि दिवाळी म्हण...

आयुष्य कसं चवीनं जगायचं !!!

शुभ्र दही पाहिलं ... की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं ! पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ? At the end of the day, ते आंबट हो...

उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका

“उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका !” तीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थि...

MLA 24102019 2110

मुंबई कुलाबा - राहुल नार्वेकर, भाजप धारावी - वर्षा गायकवाड काँग्रेस भायखळा - यामिनी जाधव, शिवसेना मलबार हिल - मंगलप्रभात लोढा, भाजप माहिम - सदा सरवणकर, शिवसेना, मुंबादेवी -अमि...