श्लोक मनातले

श्लोक मनातले

जनी सर्व सूखी असा तोचि एक |
जयाच्या नशीबी मस्त गाढ झोप ||

सकाळी जयाचे पोट साफ होते |
आभार ईश्वराचे तो  नित्य माने ||

अनंता तुला मागणे हेचि आता |
पहिला चहा रोज आयता मिळावा ||

आज कुठली भाजी अन् आमटी करावी |
रोज रोज मला याची काळजी नसावी ||

कृपा मजवरी नित्य तुझी असावी |
कामाला 'बाई' देवा चांगली मिळावी ||

वाटेल तेंव्हा मी वाट्टेल ते खावे |
वजन माझे किंचित तरी ना वाढावे ||

मनावाटे तेंव्हा शॉपिंग करावी |
कुठलीही ऑफ़र नाही सोडावी ||

सदा सर्वदा 'बॉस' प्रसन्न रहावा |
सुट्टी मागितली तरी ना चिडावा ||

वय माझे कितीही वाढत रहावे |
परी बालपण थोडे टिकून रहावे ||

नको रे मना काळजी ती कशाची |
मला दे कला आनंदी राहण्याची |
😂🤣😇😂🤣😇😂🤣

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार