ओमिक्रोन ( Omicron )
*👹 ओमिक्रोन ( Omicron ) ... खरंच भयावह का केवळ बागुलबुवा ?* *🌹डॉ. पद्मनाभ केसकर* Emergency Management Expert , Pune Mobile- 9762258650 *काय आहे हे ओमिक्रोन ( Omicron ) प्रकरण ?* गेल्या तीन -चार दिवसापासून *ओमिक्रोन* ( B.1.1.529 ) या कोरोना च्या नवीन आलेल्या Variant ची मोठ्या प्रमाणावर चर्चा मीडियामध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चालू असलेली दिसत आहे. B.1.1.529 हा कोरोना व्हायरसचा नवीनतम mutated strain साऊथ आफ्रिका आणि सभोवतालच्या काही देशांमध्ये सापडला आहे. ज्याचे नामकरण WHO ने ओमीक्रोन ( Omicron )असे केले आहे. तसेच या बदललेल्या व्हायरसला Variant Of Concern ( VOC ) असे त्यांनी जाहीर केले. *🌿या ओमिक्रोन ( Omicron ) Variant मुळे इन्फेक्शन झालेल्या लोकांची संख्या सद्यमीतिला कमी असली तरी त्याची चर्चा एवढी का होत आहे?* यामागचं कारण म्हणजे लोकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अनामिक भीती मनात आहे. लसीकरणामुळे सर्व काही ठीक ठाक चालले आहे आणि आता तिसऱ्या लाटेची काही काळजी करण्याचे कारण नाही असे वाटत असतानाच या कोरोना च्या mutated ( ऊतपरिवर्तित ) Omicron strain ची ब...