चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी

*"डॉ. हिला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काहीतरी द्या ना !"*

त्या तरूणीची आई सांगत होती.

"ग्लो येण्यासाठी म्हणजे ?"

"...चेहरा उजळण्यासाठी! चेहरा असा चमकला पाहिजे."

*"मग कानाजवळ दोन छोटे छोटे  एल ई डी  बल्ब लावा की ! सेलवरचे ! चेहरा आपोआप उजळेल."*

"डॉक्टर, तुम्ही चेष्टा करताय हं !"

"नाही, मी सीरियसली बोलतोय, चेहरा उजळण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे !"

"तसं नाही हो .....सध्या तिला बघायला रोज पाहुणे येताहेत. तेव्हा चेहरा चांगला दिसायला पाहिजे ना ! पाहा ना, चेहरा कसा निस्तेज दिसतोय ! एखादी क्रीम ,एखादा साबण असलं काहीतरी मिळालं तर बरं होईल. चेहऱ्यावर जरा तेज यायला पाहिजे !"

Dr हसले

"का हसला ?" - तिनं विचारलं.

"तू आधी काय वापरत होतीस?"

"फेअर अँड लव्हली, फेअरएवर, फेअरग्लो अशा बऱ्याच क्रीम लाऊन झाल्या ; पण फरक कशाचाच नाही ! पाच वर्षांपासून हे नाही ते किंवा ते नाहीतर हे लावत असते पण थोडा तरी फरक पडावा ? काडीचाही फरक नाही."

"बरोबर आहे; पडणारच नाही. चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी याचा उपयोगच नाही."

*👉🏻त्यासाठी  माणसाजवळ आत्मविश्वास असला पाहिजे.*

*👉🏻चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं.*

*👉🏻मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.*

*👉🏻मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.*

*👉🏻मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.*

*👉🏻मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.*

*👉🏻तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा.*

"आता काय बोलावं ?"

"पाहा ना ! इथं आल्यापासून तुमची मुलगी काही मनमोकळेपणाने बोललीच नाही.सगळं तुम्हीच बोलताय !"

*👉🏻माणसानं घडघड बोललं पाहिजे.*

*👉🏻खळखळून हसलं पाहिजे,*
*दिलखुलास विनोद केले पाहिजेत.*

*👉🏻मनसोक्त रडलं पाहिजे.*

थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.

*👉🏻त्यासाठी वाचन पाहिजे, चिंतन,नियमित व्यायाम पाहिजे, महत्वाचे म्हणजे समतोल आहार पाहिजे. हे सगळं जवळ असेल तरच चेहरा सुंदर !...*

*👉🏻...आजपासून हे सुरू कर आणि मग बघ कसा फरक पडतो ते !*

*👉🏻👉🏻लोक धबधबाच बघायला का जातात ? लोकांना पाण्याचं  साठलेलं डबकं का आवडत नसावं  ? माणसाचंही धबधब्याप्रमाणेच आहे !* *चैतन्यमय व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आवडतं !*

....आणि असं व्यक्तिमत्व म्हणजेच तेजस्वी चेहरा !

*👉🏻👉🏻व्यक्तिमत्व खुलवा चेहरा, आपोआप तेजस्वी होईल. जे लोक आरशाचा कमीत कमी उपयोग करतात तेच लोक जास्त सुंदर असतात!* 
अगदी मस्तच !! 👌👌👌

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार