Posts

Showing posts from March, 2020

प्रसाद हा देवाचा प्रतिसाद

_*॥प्रसाद हा देवाचा प्रतिसाद॥*_ _*लेखक-अनामिक.*_                                       एका छोटय़ाशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते.        गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’        माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱयावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला.        देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत ठाणे आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.        देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली.     ...

परमेश्वरश्रद्धेचे मानसशास्त्र

परमेश्वरश्रद्धेचे मानसशास्त्र --------------------        कोरोना नावाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूनं जगातल्या बलाढ्य परमेश्वरांना सळो की पळो करून सोडलेलं आहे. या जागतिक महामारीत जगातले सगळे देव लॉकडाऊन झाले. मुसके बांधून मंदिरात बसले. परमेश्वराच्या या नाकर्तेपणावर सडेतोड हल्ले झाले. होत आहेत. शिवसेनेचे खासदार तथा 'सामना'चे संपादक मा. संजय राऊत यांचा 'देव मैदान सोडून पळाले' या शीर्षकाचा संपादकीय लेख नुकताच 'सामना' मधून प्रकाशित झाला. तो बराच गाजला. त्या प्रखर बुद्धिवादी लेखानं प्रबोधनकार ठाकरेंच्या सडेतोड लेखनशैलीची आठवण महाराष्ट्राला करून दिलेली आहे. संजय राऊतांनी सदर लेखात आजच्या जैविक महायुद्धाच्या आणि वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर परमेश्वराच्या कर्तृत्वशून्यतेवर घणाघाती प्रहार करून त्याचं अस्तित्वच पार खिळखिळं करून टाकलेलं आहे.         खरेतर परमेश्वर ही लौकिक विश्वातील अलौकिक कल्पना आहे. तिचा लौकिक जीवनाशी, त्यातील सुखदुःखांशी, प्रश्नांशी काहीही संबंध नाही. आजवर मानवजातीवर असंख्य संकटे आलीत. त्यातील अनेक संकटांचे अन्वयार्थ त्याला लावता...

कोरोना नावाचे भूत

*कोरोना नावाचे भूत* मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते. जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे. अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात. अगदी प्रत्येक वर्षी मरतात. टी. बी. ने जगभर दरवर्षी 15 लाख लोक  मरतात. त्यातील फक्त भारतात पाच लाख लोक दरवर्षी मरतात. आज रोजी, अगदी आत्ता भारतात 27 लाख 90 हजार लोकांना टी. बी.ची लागण झालेली आहे. त्यातील किती मरतील हे या क्षणी सांगता येणार नाही. हे मरणाचे ...

And Suddenly

*_“And Suddenly”..._* Suddenly, we slept in one world and woke up in another. Disney has no more magic and Paris is no longer romantic. Suddenly, in New York everyone sleeps. And the Great Wall of China is no longer a fortress. The buzzling streets of Mumbai wears a forlorn look. Suddenly, hugs and kisses become weapons. Holding hands and walking the parks become outlawed.  Suddenly, not visiting aging parents and grandparents becomes an “act of love”. Suddenly, our bombs and machine guns, our tanks and artilleries begin to gather dust.  Suddenly, we realized that power is with God alone. And that money has no value when it can’t even buy you toilet paper. Suddenly, we have been put back in our place by the hands of the universe.  And we’ve been made aware how vulnerably “human” we truly are, when faced with a microbe so powerfully inhumane.  *_Stay safe_* 🙏🏻

पूर्ण लॉक डाऊन

भारताने एकवीस दिवसाचा पूर्ण लॉक डाऊन घोषित केला,  आणि तो निर्णय ऐकताना का कुणास ठाऊक डोळे उगीच भरून आले...या विचाराने की प्रशासनासाठी हा निर्णय किती प्रचंड अवघड असेल. तो घेताना किती प्रचंड तणावाचा सामना करावा लागला असेल. हा निर्णय घेतला तर अर्थव्यवस्था कोसळणार...आणि न घ्यावा  तर आरोग्यव्यवस्था कोसळणार आणि लाखो जीव जाणार. इकडे आड आणि तिकडे विहीर!  जिथं रोज नाष्टयाला काय करायचं आणि जेवायला काय असले निर्णय घेता घेता नाकात दम येतो आमच्या, तिथं हा निर्णय घेणं किती अवघड असेल!  एकीकडे भांडवलशाही अमेरिकेचे ट्रम्प सांगतायत की अमेरिका हा देश काही लॉकडाऊन करण्यासाठी जन्माला आलेला नाही. माझ्या लोकानी लवकरात लवकर कामावर परत जायला हवं..तिथे आपला देश मात्र समजूतदारपणे अर्थव्यवस्था चार पावलं मागे गेली तरी चालेल,  आमची माणसं आधी वाचली पाहिजेत असा निर्णय घेतो!  कुठलाच देश लॉकडाऊनसाठी नसतो हो जन्माला आलेला. पण अवघड परिस्थितीत अवघड निर्णय घ्यावे लागतात.  जगातले इटली आणि स्पेनसारखे देश गाफील राह्यले तर काय झालं त्यातुन धडे शिकत, साउथ कोरिया सारखा देश विजयी झाला तर त्यांनी ...

नास्तिक परिषदेत केलेले भाषण

        नास्तिक परिषदेत केलेले भाषण                 विनोद शिरसाठ मित्रहो, नास्तिकांच्या परिषदेत नगरला भाषण करायला येशील का, असं कवी संतोष पवारने विचारलं; तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता मी ‘हो’ म्हणालो. याचं कारण, एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद मला उपभोगायचा होता. जवळपास दोन दशकांपूर्वी मी बारावीनंतर नगर सोडून पुण्यात गेलो. अहमदनगर जिल्हा वाचनालय आणि महावीर वाचनालयात मी त्या आधीची तीन-चार वर्षे सरासरी रोज दोन तास वेळ घालवला होता. मुख्यत: वृत्तपत्रांचेच वाचन केले होते आणि तरीही स्वत:ला ‘नास्तिक’ म्हणवून घेण्याइतपत मजल मारली होती... तर पुण्यात गेलो आणि काहीच दिवसांनी वृत्तपत्रात एक छोटेसे निवेदन वाचले- ‘‘मी नास्तिक कसा झालो? या विषयावर निबंध पाठवा. निवडक  लेखनाला प्रसिद्धी दिली जाईल. पत्ता- माधव गवाणकर, संपादक, ‘साद’ अनियतकालिक, वडाचा कोड, मु.पो.ता.दापोली, जि.रत्नागिरी.’’ माझ्या अंगात बळ संचारले. निबंध लिहायचा ठरवले. बरेच मुद्दे काढले. संगतवार लावले. आठ-दहा पाने लिहिली. पाठवली. आणि दोन-तीन महिन्यांनंतर दहा-पंधरा पानांचे ते छोट...

कोरोना आजाराबद्दल

🦠🦠...कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती...🦠🦠 _हा मेसेज तयार करण्यास 5 दिवस लागले आहेत. विनंती करतो कृपया पूर्ण वाचा आणि इतरांना सांगा.🙏🙏🙏🙏 _ *प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे?* उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते. 🤴  *प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे?* उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे.याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2).  novel म्हणजे नवीन. या विषाणूपासून होणार्‍या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात.  *प्रश्न 3. याचा उगम (origin) कुठे झाला?* उत्तर = हा विषाणू सर्वप्रथम वुहान (Wuhan),चिन मध्ये पाहण्यात आला.हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे. *प्रश्न 4. हा विषाणू कोणत्या-कोणत्या प्रदेशात पसरु शकतो ?* उत्तर = ज्या ज्या प्रदेशात लोक रहातात अश्या सर्वच ठिकानी हा...

मराठी ब्लॉगर्स

'मराठी ब्लॉगर्स' या व्हॉट्सऍप ग्रुपतर्फे वाचकांना वेगवेगळ्या विषयांवरील ब्लॉग्स इथे वाचायला मिळतील फक्त एका लिंकवर क्लिक करा आणि वेगवेगळ्या विषयांवर संदर्भासहित माहिती वाचा:- १)  महाराष्ट्रामध्ये कुठे जावे, कधी जावे, काय पाहावे आणि काय करावे याबद्दल माहिती इथे वाचायला मिळेल. http://www.mhexplorer.in २) इतिहास, कल्चर यांच्यामाध्यमातून केलेली भटकंती याबाबत माहिती इथे वाचायला मिळेल. https://questraveler.com ३) कविता, कथा, ललित गोष्टी यांची माहिती:- https://adisjournal.com ४) विज्ञान, तंत्रज्ञान, वैज्ञानिक घटना ह्यांची सविस्तर माहिती येथे पाहायला मिळेल koolamol.wordpress.com ५) घरबसल्या ऐतिहासिक पुण्याची सफर इथे करायला मिळेल www.suprasadpuranik.com ६) ऐतिहासिक लेख तसेच भटकंती मधून दिसणाऱ्या ऐतिहासिक गोष्टी संदर्भासहित याठिकाणी वाचायला मिळतील www.shantanuparanjape.com ७) लेणी, मंदिरे, किल्ले प्रत्यक्ष फिरून त्याबद्दल जेवढे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत त्याबद्दल असलेली सगळी माहिती इथे वाचायला मिळेल. www.maharashtrachishodhyatra.com ८) भटकंती मध्ये ज्या गोष्टी बघायला मिळतात तसेच वेगवेग...

अध्यात्मशास्त्रात ज्ञानाचा अर्थ आहे

👆 *●●●"अध्यात्मशास्त्रात ज्ञानाचा अर्थ आहे – आत्म-ज्ञान." ●"आत्मज्ञानच ज्ञान आहे. बाकी सर्व विज्ञान आहे, माहिती किंवा सूचना आहे." ●असे विज्ञान मनुष्याला बाहेरुन प्राप्त होते. ●"स्थूल असणाऱ्या प्रकृतीलाच अज्ञानी ओळखतात कारण स्थूल हे इंद्रियग्राह्य आहे." परंतु ●"ज्ञानी सूक्ष्मरुपी चैतन्यालाही ओळखतात जे इंद्रियातीत आहे(अष्टावक्र गीता, आजचा भाग)."* *●आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात थोर उपदेश करत आहे की :* *अर्जुना ●"जी जाणीव ते ज्ञान"* *●"जे जाणले जाते(इंद्रियांद्वारा) ते विज्ञान* *तर्क बुध्दी विचार हे अज्ञान* *समजो तुला* *आज आपण आपणच आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या एका मानसिक, काल्पनिक जगात जगात जगत आहोत. आपले हे काल्पनिक जगत, दृश्य, स्थूल(विज्ञान) जगताचाही भाग नाही. हे स्थूल जगत आणि तुमचं मानसिक, काल्पनिक जगत ओलांडल्यावरच, जेथे देव आहे, त्या वास्तव जगतात, सूक्ष्म जगतात आपला प्रवेश होऊ शकणार आहे, अन्यथा नाही. ●स्थूलात(दृश्य जगात) देव नाही, आपल्या मानसिक, काल्पनिक जगात तर नाहीच नाही, हे समजल्यानंतरच मनुष्...

रिटायर्ड

#अंतहीन- लेखक-प्रा. डॉ. श्रीकांत तारे.         ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे साठाव्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.       नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी बीजी घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत.       आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्याबरोबर त्याचे डोळे मिटायला लागत.        ऑफिसात सगळा स्टाफ त्यावर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.         एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरण...

Surnames in Maharashtra

*Surname in Maharashtra* (दुनिया में विभिन्न प्रकार के इतने सरनेम महाराष्ट्र के अलावा कहीं नहीं मिलेंगे) *Colourful Maharashtrians*: - काळे, गोरे, पांढरे, काळभोर, हिरवे, पिवळे, ढवळे, सावळे ! *Metallic Maharashtrians*: पितळे, तांबे, लोखंडे, सोनार, चांदेकर, रत्नपारखी, हिरेखण, पूणताँबेकर! *Facial Maharashtrians*: केसकर, टकले, डोले, दाते, माने, कानफाडे, नकटे, बोबडे, तोतडे, डांगे, डोळस, डोईफोडे, टाँगे, नखाते! *Professional Maharashtrians* :  दिवेकर, वैद्य, वकील, भगत, चिटणीस, दिवाण, भालदार, कुलकर्णी, ऊद्धव, पारधी, शास्त्री, मुकादम, गोसावी, सुतार, जोशी, गुरु, पंडित, घांगरेकर! *Vegetable Maharashtrians* : आंबेकर, आंब्रे, काकडे , देठे, दुधे, बुधे, केळकर, भाजीखाये, नारळे, मुळे, पिंपळकर, वाले, भेंडे, फुलमाळी, भाजीपाले ! *Ecological Maharashtrians* : मांजरेकर, कोल्हे, कावळे, तितरमारे, वाघ, घारपुरे, वाघमारे, लांडगे, गरुड़, घारे, किटकुले, उंदीरवाडे, चीतळे, पालकर! *Funny Maharashtrians*: पाद्दे, हगे, भूत, लिडबीडे, वडाभात, पोटभरे, पोटदुखे, पोटपुसे, पोटे, उकिडवे, थूके, वाडीभस्मे, रागीट, लेले ! *Com...

पेरणी चालू आहे

लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये. त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर  त्याचे मुल्य होते १००० रुपये. त्यापासुन सुया बनविल्या तर, त्याचे मुल्य होते १०,००० रुपये. त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या  तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये. तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य  ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता  यावर तुमचे मुल्य ठरते. आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं  हे आपल्याच हातात आहे.! "आपण एक दाणा पेरला असता, आणि, निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता  तर माणसाची काय अवस्था झाली असती.?  धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं. पण  ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था  करुन ठेवली आहे.  आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो,  हजारो दाणे देतो. अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार  जीवनात आपण काय पेरत आहोत.?  दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून  शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल. आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल  तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला  या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काह...

"The Sky Gets Dark, Slowly."

'            *म्हातारपण येणे*            ' *" हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असे नव्हे, तर सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे का आवश्यक आहे, काय करायला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या कादंबरीची ही एक संक्षिप्त ओळख. "*   *"The Sky Gets Dark, Slowly." हळूहळू आभाळ गडद होत चालले आहे, संधिकाल होऊ लागला आहे.* *'Mao Dun साहित्य पुरस्कार' मिळालेले "श्री Zhou Daxin" यांची नवी कादंबरी “The Sky Gets Dark, Slowly” लवकरच प्रकाशित होत आहे. वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत केला आहे.*     त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्...

40 years ago

40 Years Ago 40 years ago, children were gentle with their parents. Today parents have to be gentle with their children  40 years ago, everyone wanted to have children. Today many people are afraid of having children. 40 years ago, children respected their parents. Now parents have to respect their children. 40 years ago, marriage was easy but divorce was difficult. Nowadays it is difficult to get married but divorce is so easy. 40 years ago, we got to know all the neighbors. Now we are strangers to our neighbors. 40 years ago, people had to eat a lot because they needed the energy to work hard. Now we are afraid to eat fatty foods for fear of the cholesterol. 40 years ago, villagers were flocking to the city to find jobs. Now the town people are fleeing from the stress to find peace. 40 years ago, everyone wanted to be fat to look happy ... Nowadays everyone diets to look healthy. 40 years ago, rich people pretended to be poor. Now the poor are pretending to be rich. 40 years ago,...

मराठी-फारसी भाषेची गंमत

मराठी-फारसी भाषेची गंमत. वाचकांस विनंती. लेख मनोरंजक आहे. लेख जसा वाचत पुढे वाचत जाल तसे तुम्हास बरेच साक्षात्कार होतील. वाचून आनंद घ्यावा. लेख सुरु. खालील वाक्य वाचा:   "मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता.  बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेऊन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो." (वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.) ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत. नाही खरे वाटत? बघा मग: दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, क...

तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी. 😄😅😀 त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले. 😌 चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या. 😌 चालून चपला झीजवणारी हि शेवटची पिढी. 😌 लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी. 😌 लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी. 😌 रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी. 😌🕊🕊🐤 ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी. 😌 कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी. 😌 कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता. 😌 माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत. 😌 बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या. 😌 संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या. 😌 ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो. 😌 तुटलेल्या कॅसेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळ...