Posts

Showing posts from April, 2022

सेवापूर्ती

.... 🙏 खूप खूप धन्यवाद. माझी शासन सेवा सलग एकूण ३६ वर्ष ४ महिने एव्हडी झाली. कनिष्ठ-शाखा अभियंता १४ वर्ष. उप अभियंता १६ वर्ष. कार्यकारी अभियंता ६ वर्ष ४ महिने. मुंबई व नाशिक या दोन्ही परिमंडळात मला अनेक मोठमोठ्या पुलांवर,रस्ते बांधणीत, बीओटी प्रकल्पावर,पोलिस गृहनिर्माण महामंडळात इमारतींच्या  अनेक मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. उपअभियंता पासून सचिव स्तरावरील   वरिष्ठ अभियंत्यांच्या कार्यकुशल व तंत्रकुशलतेने मला वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त झाले. सर्वांनी मला सांभाळून घेतले. माझ्या चुका पोटात घातल्या. पोलिस गृहनिर्माण महामंडळामध्येही सा बा विभागातीलच अनेक वरिष्ठ अधिकारी व गृह विभागातील अनेक दिग्गज पोलिस अधिकारी, पोलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी प्राप्त झाली.या सर्वांचा मी कायम ऋणी आहे. आपल्या या ग्रुप मधील सार्वजनिक बांधकाम विभागातील बहुसंख्य नामवंत, दिग्गज वरिष्ठ अधिकारी अभियंत्यांच्या हाताखाली काम करायची मला संधी मिळाली. काम करताना वेळोवेळी त्यांनी प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी व कायम ऋणी आहे. या ग्...

जगात देव वगैरे काही नाही.

*ब्राह्मण समाजातील नागपूर येथील एकता जोशी या ताईंनी स्वतःचे नाव व पत्ता देवून हा लेख लिहिला आहे. अवश्य वाचा तुम्हांला सत्य काय हे माहीत पडेल आणि तुमच्या मनातील शंका दूर होईल. एवढे सर्व बिनदिक्कत सर्वांच्या समोर त्यांनी मांडून शेवटी दुर्दम्य आत्मविश्वास प्रगट केलाय की मी टाहो फोडून जरी हे सांगतेय तरी डोळ्यावर पद्धतशीर कातडे ओढून बसलेला बहुजन समाज हे मानायला तयार होणार नाही!!!*   *या ताईचे मनःपूर्वक अभिनंदन खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!!* 🙏🙏🙏 *मी ब्राम्हण समाजातील नागपूरची महिला एकता जोशी...* *आम्हांला हे माहीत आहे की जगात देव वगैरे काही नाही. पण आम्ही सतत लोकांना देवदेव करायला सांगतो, कारण त्याने आमचे पोट भरते.* *खर सांगून दमडीही कुणी देत नाही. खोटं सांगून हजारो रुपये मिळतात.* *पूजा, पाठ, अभिषेक, आशीर्वाद, वरदान, हस्त, पुण्य, मोक्ष हे सर्व निखालस खोटे आहे, वर स्वर्गही नाही आणि नरकही नाही.* *काल्पनिक नरक आम्हीच निर्माण केला लोकांना भीती दाखवण्यासाठी.* *आम्हीच नवीन पंथाची, नवनवीन पूजांची निर्मिती करतो. लोकांनाही नवीन पाहिजे असते.* *खर सांगू भारतात इतके मूर्ख लोक आहेत की...

भाकरी’ हिसकावणारा `धर्म’

*दै.देशोन्नती*/ २२ एप्रिल २०२२ *`भाकरी’ हिसकावणारा `धर्म’* *🖋️ लोकनाथ काळमेघ* _धार्मिक सलोखा बिघडावा, त्यातून दंगली घडाव्यात आणि या दंगलींच्या रखरखत्या वातावरणात आपण आपली राजकीय पोळी शेकून घ्यावी, हा या दंगलखोरांचा एकमेव उद्देश असतो. प्रत्यक्षात दंगलीत हजेरी लावणारे मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी मोहताज होतात._   गेल्या काही दिवसांपासून देशात हिजाब, गोमांस, मशिंदीवरील भोंगे यावरून धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. अशावेळेस राज्यकर्त्यांचे धोरण या सशस्त्र संघटनांना संरक्षण देणारे वाटत आहे. राज्यकर्ते याबाबत मौनात आहेत. धर्मरक्षणाचा भार उचलणारे कार्यकर्ते भांडत आहेत. यामधून मोठ्या दंगलीचे संकेत मिळत आहेत. गरज नेमकी काय आहे, हे जर जनतेला समजले नाही, की धार्मिक आणि जातीय प्रोपगंडा लोकांची माथी भडकवतो. हा प्रोपगंडा करणारे वर्षानुवर्षे सातत्याने चिकाटीने आणि प्रतिकूल परिस्थितीतही लोकांचे डोके फिरविण्याचे काम करीत असतात. या प्रोपगंडाचे दृश्य परिणाम म्हणजे देशातील बहुसंख्य तरूण, तरुणींना आणि मध्यमवर्गाला (मुख्यत: मध्यम जातींमधील समाज समूह) आज या हिंदुत्ववादी विचारप्रवाहाने दिलेली `आम्ही हिं...

संप्रेरके

चार संप्रेरके जी माणसाला आनंदी ठेवतात.. जरूर वाचा बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेले मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो. थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की ती आयुष्यात आनंदी नाही आहे. माझा विश्वास बसेना कारण लौकिक दृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, "असे का वाटते तुला?" "मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे." आता मी स्वतःला विचारू लागलो की खरच मी स्वतः आनंदी आहे का? काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला - नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते. माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे? आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले. त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे. तो म्हणाला, आपल्या शरीरात चार संप्रेरके असतात यांच्यामुळ...