सेवापूर्ती


....
🙏
खूप खूप धन्यवाद.


माझी शासन सेवा सलग एकूण ३६ वर्ष ४ महिने एव्हडी झाली.

कनिष्ठ-शाखा अभियंता १४ वर्ष.
उप अभियंता १६ वर्ष.
कार्यकारी अभियंता ६ वर्ष ४ महिने.

मुंबई व नाशिक या दोन्ही परिमंडळात मला अनेक मोठमोठ्या पुलांवर,रस्ते बांधणीत, बीओटी प्रकल्पावर,पोलिस गृहनिर्माण महामंडळात इमारतींच्या  अनेक मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली.

उपअभियंता पासून सचिव स्तरावरील   वरिष्ठ अभियंत्यांच्या कार्यकुशल व तंत्रकुशलतेने मला वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त झाले. सर्वांनी मला सांभाळून घेतले. माझ्या चुका पोटात घातल्या.

पोलिस गृहनिर्माण महामंडळामध्येही सा बा विभागातीलच अनेक वरिष्ठ अधिकारी व गृह विभागातील अनेक दिग्गज पोलिस अधिकारी, पोलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी प्राप्त झाली.या सर्वांचा मी कायम ऋणी आहे.

आपल्या या ग्रुप मधील सार्वजनिक बांधकाम विभागातील बहुसंख्य नामवंत, दिग्गज वरिष्ठ अधिकारी अभियंत्यांच्या हाताखाली काम करायची मला संधी मिळाली. काम करताना वेळोवेळी त्यांनी प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी व कायम ऋणी आहे.

या ग्रुप मधील अनेक अभियंत्यांच्या सोबत समकक्ष काम करायची संधी मला मिळाली. या सर्वांनी वेळोवेळी मला मोलाची मदत केली, माझ्या सुखदुःखात वेळोवेळी धाऊन आले, स्नेह वृद्धिंगत केला त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.

या शासन सेवेत मला मोठा मित्र परिवार मिळाला. अनेक जिवलग मित्रांनी मला वेळोवेळी मदत केली, भावनिक व मानसिक धीर दिला त्यामुळेच हे मार्गक्रमण शक्य झाले.

जाणता-अजाणता जर कोणाची मने मी दुखावली असतील तर त्यांची मी क्षमा मागतो.मला ते उदार मनाने क्षमा करतील अशी मला आशा आहे.

असाच स्नेह, हृणानुबंध यापुढेही कायम राहील अशी मला खात्री आहे.

मी आपणा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.
🙏🙏🙏
😃😃😃

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार