मराठी शब्द ठेवा

*मोट गेली, नाडा गेला,*
*गेला सोंदुर कणा* 
*सहा बैल नांगर आता,*
*दिसेल का हो पुन्हा*
*हेल गेला, कासरा गेला,*
*गेली शर्यत बैल गाडीची.*
*मोगरी गेली, हातणी गेली,*
*गेली मळणी धान्याची.*  
*वावडी गेली, उपननी गेली,*                 
*गेली धार धान्याची.*
*भुसारा गेला, कलवड गेला,*
*गेली इर्जिक नांगराची*         
*वाडगं गेलं, खळं गेलं,*
*गेली शान झोपाट्याची.* 
*सावड गेली, बलुतं गेलं,*लोहारकी गेली सुतारकी*
*गेली राखुळी गुरांची.*
*हौद गेला, सारन गेली,*
*गेली बारव जुनी* 
*वढवान गेलं, रहाट गेलं* 
*शेंदु कसं पाणी* 

*मेड गेली, कुड गेला* 
*गेला वसा आढं* 
*कुळव गेला, डुब्बं गेल* 
*फराड गेलं पुढं*

*खुरवत गेला, खळं गेलं*
*चंद्राचं ते तळं गेलं*  

*हरनाची गाडी गेली* 
*मामाची पण माडी गेली* 
*हेल गेला, गंजं गेली*
 
*करडईचा फड गेला* 
*अंगणात लावलेला भला मोठा वड गेला*

*बोरं गेली, जांभळं गेली* 
*गेला रानमेवा* 
*खंबीर होती जूनी पिढी* 
*गावाकडे तेव्हा*
 
*आता कुठ शोधायच्या* 
*गावाकडच्या वाटा* 
*प्रगतीच्या नावाखाली* 
*मोजू कसा तोटा* 

*सांग मिञा, कधी आता* 
*गावाकडे जायचं* 
*ताटलीत दुध भाकर* 
*चुरून मुरून खायचं*

*यातले कितीतरी शब्द आपल्याला भविष्यात आठवणारसुद्धा  नाहीत. 🙏*
*शेतकरी गड्या आपला गावच बरा.*

*कदाचित यातील कित्येक शब्द पुढील  पिढीला कळणार देखील नाहीत.  😔*

*पण हा अनमोल मराठी शब्द ठेवा आपण सर्वांनी  जतन  करायलाच हवा.*

🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार