भाषेत एवढी विशेषणं
*आहेत का कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?* *लुसलुशीत*- पोळी/ पुरणपोळी *खुसखुशीत*- करंजी *भुसभुशीत*- जमीन *घसघशीत*- भरपूर *रसरशीत*- रसाने भरलेले *ठसठशीत*- मोठे *कुरकुरीत*- चकली, कांदा भजी *चुरचुरीत*- अळूवडी *झणझणीत*- पिठले, वांग्याची भाजी *सणसणीत*- मारण्याचे विशेषण *ढणढणीत*- मोठ्या आवाजात लावलेले संगीत *ठणठणीत*- तब्येत *दणदणीत*- भरपूर *चुणचुणीत*- हुशार *टुणटुणीत*- तब्येत *चमचमीत*- पोहे, मिसळ *दमदमीत*- भरपूर नाश्ता *खमखमीत*- मसालेदार *झगझगीत*- प्रखर *झगमगीत*- दिवे *खणखणीत*- चोख *रखरखीत*- ऊन *चटमटीत/ चटपटीत*- खारे शंकरपाळे, भेळ *खुटखुटीत*- भाकरी/ दशमी *चरचरीत*- अळूची खाजरी पाने *गरगरीत*- गोल लाडू *चकचकीत*- चमकणारी गोष्ट *गुटगुटीत*- सुदृढ बालक *सुटसुटीत*- मोकळे *तुकतुकीत*- कांती *बटबटीत*- डोळ्यात भरण्या जोगे *पचपचीत*- पाणीदार *खरखरीत*- गुळगुळीत नसणारे *खरमरीत*- पत्र *तरतरीत*- नाकाची उपमा *सरसरीत/सरबरीत*- भज्यांचे पीठ *करकरीत*- सफरचंद, पेरूच्या फोडी *झिरझिरीत*- पारदर्शक *फडफडीत*- मोकळा भात *शिडशिडीत*- बारीक *मिळमिळीत*- कमी तिखट मसाला असलेला पदार्थ *गिळगिळीत*- मऊ लापशी *बुळबुळीत*- ओलसर...