अहंकार
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या अश्या स्वतःच्या *ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो ना...* देवबाप्पाचे खूप खूप आभार की एखाद्याबद्दल कायमची अढी धरुन बसण्याचा कोता स्वभाव त्याने मला दिला नाही... म्हणूनच हा मेसेज मला खूपच आवडला..आणि सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला... कुणी लिहिलाय माहीत नाही... *नाती* *कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की,लक्षात येतं की,असे अनेकजण...ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होत ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच.....* *भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.त्यांची एखादी कृती, चूक हा जणू काही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळलंच नाही.नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही, तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते.....* *आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसतसं लक्षात येतं की,भावना आणि अह...