मराठी भाषेचा श्रृंगार

मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही... 
किती वेळ लागतो... 
बोअरिंग काम...  
इंग्रजित कसं पटापट 
टाईप होतं... 
तुमचं मराठी म्हणजे......"

मी त्याला सांगितलं, 
"अरे बाबा श्रीमंत आणि 
गरिबामध्ये तेवढा फरक असणारच". 

तो खुश होऊन म्हणाला 
"चला म्हणजे मराठी गरीब 
हे तू मान्य केलंस तर"?? 

मी म्हटलं  
"मित्रा चुकतोयस तू..  

इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?"

तो म्हणाला २६..

मी म्हटलं  

"मराठीत याच्या दुप्पट 

५२ आहेत..

इंग्रजिच्या दुप्पट मालमत्ता 
आहे आमची..

आता सांग, 
कोण गरीब आणि 
कोण श्रीमंत? 

केवळ जीन्स घालून बाहेर 
पडणारी स्त्री पटकन 
तयार होऊ शकते..
 
पण भरजरी कपडे घालून 
सर्व दागदागिने धालून 
बाहेर पडणारी स्त्री 
जास्त वेळ घेणारच..

आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते..

म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही, 
तिचं सौंदर्य बघून सर्व 
धन्य होतात."

 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
 मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदिंचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली. कुणी लिहिली हे कदाचित विकी'पीडी'या लाच ठाऊक असेल. 
वाचाच, मस्त आहे..!

🌹

*शृंगार मराठीचा*                  
 
_*अनुस्वारी*_ शुभकुंकुम ते 
भाळी सौदामिनी |              

_*प्रश्नचिन्ही*_ डुलती झुमके 
सुंदर तव कानी |             

नाकावरती _*स्वल्पविरामी*_
शोभे तव नथनी |              

_*काना*_-काना गुंफुनी माला 
खुलवी तुज मानिनी |       

_*वेलांटी*_चा पदर शोभे
तुझीया माथ्याला |                 

_*मात्रां*_चा मग सूवर्णचाफा
वेणीवर माळला |          
    
_*उद्गारा*_चा तो गे छल्ला
लटके कमरेला |                   

_*अवतरणां*_च्या बटा 
मनोहर भावती चेहर्‍याला |     
      
_*उ*_काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरी |         

_*पूर्णविरामी*_ तिलोत्तम तो 
शोभे गालावरी ॥

🌹मराठी भाषेचा श्रृंगार

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार