Water bound macadam
Water bound macadam म्हणजे काय?
हातफोडीची किंवा क्रश्ड खडीची रोलरने दबाई करून खडी एकमेकांत घट्ट अडकवणे व खडीच्या सभोवती राहिलेल्या पोकळ्या स्क्रिनिंग व बायडिंग मटेरिअल पाण्याच्या सहाय्याने भरून टाकणे.
खडी कशी असावी?
ग्रेड 1 व 2 साठी
हातफोडी किंवा क्रशरने फोडलेली चालेल
अब्राझन व्हॅल्यू < 40%
इम्पॅक्ट व्हॅल्यू < 30%
फ्लाकीनेस व्हॅल्यू < 35%
Size and grading requirements
ग्रेड 1 जाडी 10 सेमी कॉम्पक्टेड
साईझ 63 मीमी ते 45 मीमी
चाळणी खाली जाणाऱ्या खडीची %
75 मीमी 100%
63 मीमी 90-100%
53 मीमी 25-75%
45 मीमी 0-15%
22.4 मीमी 0-5%
वरील टेबल वरून असे लक्षात येते की 63 मीमी चाळणीतून 100% खडी पास झाली तरी चालते, म्हणजे सगळी खडी 63 मीमी पेक्षा लहान असायला पाहिजे, तर वरील टेबल वरून असेही लक्षात येते की 45 मीमी चाळणीतून 0% खडी पास झाली तरी चालेल, म्हणजे सगळी खडी 45 मीमी पेक्षा लहान नसली पाहिजे, यावरून आपण असे अनुमान काढू की ग्रेड 1 ची खडी 50 मीमी (२ इंच) जाडीची असायला पाहिजे. या पेक्षा जास्त मोठी नको व लहानही नको. झाले एव्हढे तपासले की ग्रेड 1 च्या ग्रेडेशन ची काळजी करायला नको.
ग्रेड 2 जाडी 7.5 सेमी कॉम्पक्टेड
साईझ 53 मीमी ते 22.4 मीमी
चाळणी खाली जाणाऱ्या खडीची %
63 मीमी 100%
53 मीमी 95-100%
45 मीमी 65-90%
22.4 मीमी 0-10%
11.2 मीमी 0-5%
वरील टेबल वरून असे लक्षात येते की 45 मीमी चाळणीतून 90% खडी पास झाली तरी चालते, म्हणजे 90% खडी 45 मीमी पेक्षा लहान असायला पाहिजे, तर वरील टेबल वरून असेही लक्षात येते की 22.4 मीमी चाळणीतून 0% खडी पास झाली तरी चालेल, म्हणजे सगळी खडी 22.4 मीमी पेक्षा लहान नसली पाहिजे, यावरून आपण असे अनुमान काढू की ग्रेड 2 ची खडी 40 मीमी (1.25 इंच) जाडीची असायला पाहिजे. या पेक्षा जास्त मोठी नको व लहानही नको. एव्हढे तपासले की ग्रेड 2 च्या ग्रेडेशन ची काळजी करायला नको.
साहित्याची गणना
ग्रेड 1
मोठी खडी 0.91 ते 1.07 घनमी
टाईप A स्क्रिनिंग खडी 0.18 ते 0.21 घनमी
किंवा
टाईप B स्क्रिनिंग खडी 0.20 ते 0.22 घनमी
लिक्विड लिमिट - < 20
प्लॅस्टिसिटी इंडेक्स <6
क्रशेबल स्क्रीनिंग 0.22 ते 0.24 घनमी
ग्रेड 2
मोठी खडी 0.91 ते 1.07 घनमी
स्क्रिनिंग खडी 0.18 ते 0.21 घनमी
क्रशेबल स्क्रीनिंग 0.22 ते 0.24 घनमी
1) ज्या पृष्ठभागावर खडीकरण करायचे आहे त्यावरील लूज मटेरिअल काढून टाकावे
2) रोलरच्या दबाई मुळे खडी पसरू नये म्हणून रस्त्याच्या बाजू पट्टयांचे काम अगोदर करून घ्यावे
3)योग्य त्या आकाराची खडी योग्य त्या जाडीने रस्त्याच्या मंजूर लांबीत पसरून घ्यावी
4)खडी पसरून झाल्यावर रोलर ने दबाई करून घ्यावी. दबाई कडेपासून सुरू करून रस्त्याच्या मध्याकडे न्ह्यावी. रोलर आत सरकवत असताना 30 सेमी चा ओव्हरलॅप ठेवावा. खडी एकमेकांत अडकली आहे याची खात्री होई पर्यंत दबाई करावी. खडी क्रश होत असल्यास दबाई थांबवावी.
5) खडीची योग्य दबाई झाल्यानंतरच स्क्रिनिंग मटेरिअल टाकावे. एकुण स्क्रिनिंग मटेरिअल एकाच वेळी न पसरवता ते तीन भागात विभागून तीन वेळा पसरावे. स्क्रिनिंग मटेरिअल पसरवत असताना ड्राय रोलिंग सुरूच ठेवावे.
6) प्रत्येक वेळी स्क्रिनिंग टाकून ड्राय रोलिंग झाल्यावर त्यावर पाणी मारावे. पाणी इतके मारावे की ते पाणी स्क्रिनिंग मटेरिअलला खडीच्या खचक्यात (व्हाईड्स) घेऊन जाईल. किंवा लोखंडी झाडूने ते खडीच्या व्हाईड्स मधें ओढावे. यावर पुन्हा रोलिंग करावे.
7) स्क्रिनिंग मटेरिअलची योग्य पसरणी पूर्ण झाल्यावर ब्लाइंडेज मटेरिअल पसरावे. ब्लाइंडेज मटेरिअल एकाच वेळी न पसरवता ते तीन भागात विभागून तीन वेळा पसरावे. ब्लाइंडेज मटेरिअल पसरून झाल्यावर त्यावर पाणी मारावे. पाणी इतके मारावे की ते पाणी ब्लाइंडेज मटेरिअलला खडीच्या खचक्यात (व्हाईड्स) घेऊन जाईल. किंवा लोखंडी झाडूने ते खडीच्या व्हाईड्स मधें ओढावे व रोलिंग करावे
8) दबाई झाल्यानंतर रात्रभर ट्राफिक सोडू नये अन्यथा खडीकरणाचा थर सेट होणार नाही. जे मटेरिअल आपण स्क्रीनिंग व ब्लाइंडेज म्हणून वापरले आहे ते घट्ट झाले नाहीतर खडीकरण टिकणार नाही. म्हणून खडीकरण करताना वापरत असलेली मशिनरीचा वापर सुद्धा काळजी पूर्वक करावा व अन्य वाहनांचे येणे जाणे सुद्धा बंद करावे.
9) प्रोफाइल चेकिंग- रस्त्याच्या लांबीच्या दिशेने स्ट्रेटएज वापरून ओबडधोबड पणा तपासावा. ग्रेड 1 च्या बाबतीत जमिनीचा पृष्ठभाग व स्ट्रेटएज मध्ये 12 मीमी पेक्षा जास्त खळगा असू नये. ग्रेड 2 च्या बाबतीत जमिनीचा पृष्ठभाग व स्ट्रेटएज मध्ये 10 मीमी पेक्षा जास्त खळगा असू नये. जर 300 मी लांबीत आशा खळग्यांची संख्या 30 पेक्षा जास्त झाली तर अशा ठिकाणच्या 10 sq m खडीकरणाचा थर काढून टाकून परत सर्व प्रक्रिया करावी लागेल.
Comments
Post a Comment