HAPPY THOUGHTS
HAPPY THOUGHTS
*झुका तितकंच जितकं बरोबर आहे. कारण, विनाकारण झुकण्याने सुध्दा आपली किंमत कमी होत जाते. आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो❗*
*प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही, कधी कधी एकटे पण लढावे लागते, पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम*
*करतील❗*
*कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका. कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही. आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही❗*
*भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो❗*
*मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात❗*
*श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपसता ती पण "श्रीमंती" असते❗*
*परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणुसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं❗*
*जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते❗*
*बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरु नये❗*
*अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा❗*
*आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो‼️*
*┉❀꧁꧂🌞꧁꧂❀┉*
*‼️🌹सुप्रभात🌹‼️*
🍃🍂🌷🙏🌷🍂🍃
*┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉*
Comments
Post a Comment