पुनर्भेट
🤝 पुनर्भेट 🤝
*कुणाचे आयुष्य किती असेल हे आपणास माहिती नाही, म्हणून जो क्षण येईल तो आनंदाने जगा...*
*ही गोष्ट आहे चार जिवलग मित्रांची....*
*जे एकाच शाळेत जुन्या एसएससी पर्यंत शिकले. त्या शहरात श्रीमंतांचं आलिशान असं एकच हाॅटेल होतं, ते कॅम्पमध्ये.*
*त्याची चर्चा त्यांच्याही कानावर आलेली होती की, तेथील चहा देखील त्यावेळी दहा रुपयाला मिळत असे, जेव्हा अमृततुल्यचा चहा पंचवीस पैशाला होता.*
*एसएससीची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की, आपण त्या हाॅटेलमध्ये जाऊन एकदा चहा घ्यायचाच.*
*त्यासाठी चौघांनी चाळीस रुपये जमवले.*
*रविवारचा दिवस होता, साडेदहाच्या सुमारास आपापल्या सायकलीवरुन चौघेही त्या हाॅटेलवर पोहोचले.*
*तेथील सिक्युरीटीवाल्याने त्यांना फाटकाशी अडवले.*
*तेव्हा चौघांनी आम्हाला चहा घ्यायचा आहे, असे सांगितले.*
*तेवढ्यात एका सुटातील तरुणाने त्यांना आत बोलावले.*
*हे चौघेही गार्डन रेस्टाॅरंटमध्ये बसल्यावर त्या तरुणाने जवळ येऊन चौकशी केली.*
*तेव्हा प्रत्येकाने आपलं नाव सांगितले व चहाची आँर्डर दिली.*
*एका वेटरने चहाचा ट्रे आणला व त्यांच्या पुढ्यात ठेवला.*
*दिनेश, संतोष, मंदार व प्रसन्न यांनी चहा घेता घेता गप्पा मारण्यास सुरुवात केली.*
*चौघांनी एकमताने असं ठरवले की, पन्नास वर्षांनंतर आपण याच हाॅटेलमध्ये याच तारखेला एकत्र यायचं.*
*त्यादिवशी जो सर्वात उशीरा येईल, त्याने हाॅटेलचं झालेलं बिल भरायचे!*
*तेवढ्यात तो सुटातील तरुण बिल घेऊन आला, त्याच्याकडे पैसे देताना दिनेशने चौघांनी, ठरलेली गोष्ट त्याला सांगितली.*
*त्यालाही त्या चौघांचे कौतुक वाटले.*
*त्याने स्वतःची ओळख त्यांना करुन दिली, ' मी कुमार गौडा.*
*मी याच महिन्यात इथे नोकरीला लागलो आहे, पन्नास वर्षांनंतर कदाचित मी इथेच असेन तर, आपण नक्कीच भेटू.'*
*चौघेही पुढचं शिक्षण घेण्यासाठी पांगले.*
*दिनेशच्या वडिलांची बदली झाल्याने तो शहर सोडून गेला.*
*संतोष पुढच्या शिक्षणासाठी काकांकडे गेला.*
*मंदार व प्रसन्न यांनी शहरातीलच वेगवेगळ्या काॅलेजमध्ये प्रवेश घेतला.*
*दिवस, महिने, वर्षं निघून गेली.*
*त्या शहरात पन्नास वर्षांत आमूलाग्र बदल झाला.*
*शहराची लोकसंख्या वाढली. रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रोमुळे शहराचा चेहरामोहराच बदलून गेला.*
*ते कॅम्प भागातील हाॅटेल काळानुरूप, नूतनीकरणाने भव्य झालेलं होतं.*
*त्यासारखीच इतरही अनेक फाईव्हस्टार हाॅटेलं शहरात असली तरी सर्वांत जुनं, अत्याधुनिक सोयी असलेलं ते हाॅटेल शहराची 'शान' होतं.*
*आता त्या हाॅटेलचा मॅनेजर होता, कुमार गौडा.*
*पन्नास वर्षांनंतरच्या ठरलेल्या तारखेला दुपारी एक आलीशान कार हाॅटेलच्या दाराशी उभी राहिली.*
*दिनेश कारमधून उतरला व काठी टेकत पोर्चमध्ये जाऊ लागला.*
*तेव्हा एक टक्कल असलेल्या सुटमधील लठ्ठ आँफिसरने दिनेशला पाहून शेकहॅण्डसाठी हात पुढे केला..*
*दिनेशने निरखून पहात विचारले, 'कुमार गौडा?' कुमारने हसून दाद दिली व दिनेशला घट्ट मिठी मारली..*
*कुमारने सांगितले की, प्रसन्न सरांनी तुमच्यासाठी टेबल एक महिन्यापूर्वीच बुक करुन ठेवलंय.*
*दिनेश मनोमन खुश झाला होता की, तो चौघात पहिला आल्याने, आज होणारं बिल त्याला भरावं लागणार नव्हतं.*
*तासाभराने संतोष आला.*
*संतोष शहरातला मोठा बिल्डर झाला होता.*
*वयोमानानुसार तो आता बुजुर्ग ज्येष्ठ नागरिक दिसत होता.*
*आता दोघेही गप्पा मारत, त्या दोघांची वाट पाहू लागले. अर्ध्याच तासात मंदार आला.*
*त्यांच्याशी बोलताना दोघांना समजले की, मंदार उद्योगपती झालाय.*
*तिघेही शाळेतील आठवणींना उजाळा देत होते.*
*तिघांची नजर सारखी दरवाजाकडे जात होती, की प्रसन्न कधी येतोय?*
*तेवढ्यात कुमार आला व त्याने आँर्डर घेऊन सांगितले की, प्रसन्न सरांकडून निरोप आला आहे..*
*तुम्ही सुरुवात करा.. मी येतोय..*
*तिघेही पन्नास वर्षांनंतर एकमेकांना भेटून खुशीत आले होते.*
*चेष्टा मस्करी, गप्पात तास होऊन गेला.*
*स्नॅक्स खाऊन झाले होते. दिनेशला आठ वाजेपर्यंत निघायचे होते. त्यामुळे त्याने जेवणाची आँर्डर दिली.*
*कुमार पुन्हा पुन्हा त्यांना भेटून काय हवं नको ते पहात होता.*
*जेवण झाले. तिघांच्याही आवडीचा मेनू प्रसन्नाने कुमारला सांगून ठेवला होता.*
*दिनेशने कुमारला बिल मागितले, तर कुमारने बिल पेंड झाल्याचे सांगितले. प्रसन्नने आँनलाईन बिल पेड केले होते..*
*तिघेही निघायच्या तयारीत असताना आठ वाजता, आलिशान कारमधून एक व्यक्ती उतरली व या तिघांकडे आली.. तिघेही त्या व्यक्तीकडे पहातच राहिले.. तरुण वयातील प्रसन्न त्यांच्यापुढे उभा होता. तो तरुण बोलू लागला, 'मी प्रसन्न यांचा, तुमच्या मित्राचा मुलगा.*
*बाबांनी मला आजच्या तुमच्या भेटीबद्दल सांगितलेलं होतं.. ते या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते.. गेल्याच महिन्यात ते दुर्धर आजाराने गेले...😔*
*मला त्यांनी सांगून ठेवलं होतं की, तू उशीराने त्यांना भेटायला जा. लवकर गेलास तर मी या जगात नाही म्हणून, ते दुःखी होतील. आणि एकमेकांना भेटण्याचा आनंद गमावून बसतील.....*
*मला त्यांनी हे देखील सांगून ठेवलं होतं की, माझ्या वतीने तू त्यांना मिठी मार.' असं म्हणून प्रसन्नच्या मुलाने दोन्ही हात पसरले.. ह्या तिघांनीही त्याला मिठीत घेतले व आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.*
*त्या प्रसन्नच्या मुलाचे दोन्ही खांदे अश्रूंनी ओले झाले होते..*
*कुमार गौडा, त्या जिवलग मित्रांची गळाभेट पाहून, स्वतःच्या डोळ्यातील अश्रू रुमालाने टिपत राहिला.....*😢😢😢
*म्हणूनच....*
*सर्वांना भेटत रहा...*
*आपले नातलग, मित्र-मंडळीन्ना भेटत रहा...*
*कुटुंबासहीत भेटत रहा...*
*आपले जिवंत असल्याचे सुख अनुभवा...*
*नसण्याचे दुखः सहन करता आले पाहीजे.....😢 😔😢😔*
*कुणी लिहिलं माहीत नाही, पण खूप सुंदर लिहिलेलं आहे...* 🙏
🌼🌼 जय हिंद🌼🌼
Comments
Post a Comment