आई
*🙏🏻 आई🙏🏻*
*🌿काहीच बोलता न येणारी बाळं*
*बोलायला शिकतात*
*बोलायला शिकवलेल्या आईला*
*कधी कधी खूप खूप बोलतात🌿*
*🌿मान्य आहे पहिला संघर्ष*
*आईशीच असतो*
*बोलताना, तिच्या भावनांचा अर्थ*
*समजून का घ्यायचा नसतो?🌿*
*🌿नको म्हणा, रागवा, तिरस्कार करा*
*हवे तसे बोला, मस्करी करा*
*ती कायम तुमच्या पाठीशीच असते*
*कारण ती वेडी असते🌿*
*🌿नाही जेवला, अभ्यास नाही केला,*
*लवकर नाही उठला, नाराज दिसला*
*सतत विचारपूस करत राहते*
*कारण ती वेडी असते🌿*
*🌿तुम्हाला रागावते, पण तीच रडते*
*मोठे व्हावे तुम्ही म्हणून सतत झटते*
*स्वतःला विसरते, तुमच्या विश्वात रमते*
*कारण ती वेडी असते🌿*
*🌿जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते*
*हरला तर खंबीर बनवते*
*तुम्ही असाल कसेही,* *जीवापाड जपते*
*कारण ती वेडी असते🌿*
*🌿ती नाही कळणार , नाही उमगणार*
*तीच्यामुळे आपण काहीसे घडलो*
*हे आज नाहीच आपल्याला पटणार*
*कारण ती वेडीच वाटणार🌿*
*🌿खरं तर ती वेडी नसतेच कधी*
*मातृत्वाची जबाबदारी पेलत पेलत*
*स्वतःला ही नव्यानं फुलवत असते*
*स्वप्नातील दिवस तुमचे*
*वास्तव स्वीकारुन बघत असते*
*कारण ती "आई" असते🌿*
*🌿ती उमगू लागते तेव्हा आपण*
*मागे जाऊ शकत नसतो...*
*ती असेपर्यंत थोडीशी समजली तरी*
*यासारखा खरा आनंद नसतो,,,🌿*
Comments
Post a Comment