पावसाला विचारलं तुझं वय काय?
*आज मी पावसाला विचारलं तुझं वय काय?*
*पावसानं मला सुंदर उत्तर दिलं, जर तू पावसात सैर वैरा आनंदात धावत असशील तर माझं *वय १०*
*जर तू पावसात कविता लिहित असशील तर माझं वय १६*
*जर तुला पावसात विरह जाणवत असेल तर माझं वय १८*
*जर तुला पावसात ट्रेकिंग ला जावंस वाटत असेल तर माझं वय २४*
*जर तुला पावसात गजरा घ्यावासा वाटत असेल तर माझं वय ३०*
*जर तुला मित्रां सोबत पावसात भिजत भजी खावी असं वाटत असेल तर माझं वय ४०*
*जर तुला पावसात छत्री घ्यावी लागली, तर माझं *वय ५०*
*मग मी पावसाला म्हणालो*
*"अरे एक काय ते वय सांग,*
*शब्दात गुंतवू नकोस!"*
*स्मितहास्य देऊन म्हणाला पाऊस, तू जसे अनुभवशील*
*तेच माझे वय!!*
☔ *Happy Morning*🌞
Comments
Post a Comment