Pleasure म्हणजे काय असतं
*देणाराचे मन मोठ पाहिजे म्हणजे घेणाराही सुखावतो*
बायकोने नविन *activa* घेतली आणि गेले वर्षभर *pleasure* गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी *pleasure sell* ची add टाकली, 'want to sell for *Rs. 30,000/-..'*
कुणी 15 हजारांत मागितली, तर कुणी 26, तर एकाने 28 हजारात मागितली. *पण मी जास्त पैसे येतील, या अपेक्षेने* कुणालाच 'हो' म्हटले नव्हते...
थोड्या वेळाने एक काॅल आला आणि तो म्हणाला...
"साहेब, *30 हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 24 हजारच जमलेत*. थोडं थांबाल का, *माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे* येतात, ते बघतो.
*पण pleasure मलाच द्या...*
माझा मुलगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. *शेवटचे एक वर्ष तरी त्याने गाडीवरून जावे, असे मला वाटते*. नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे, ती नाही घेऊ शकत..."
*मी फक्त 'ok बघू', असे म्हणालो आणि फोन ठेवला...*
नंतर थोडा वेळ विचार केला आणि call back करून म्हणालो, "जरा थांबा, मोबाइल विकू नका. *उद्या सकाळी या घरी आणि गाडी घेवून जा, फक्त 24 हजारामध्ये*......"
माझ्यासमोर 28 हजाराची आॕफर असताना पण *मी त्या अपरिचित व्यक्तीला 24 हजारामधे pleasure देणार होतो*....
आज त्या कुटुंबात किती आनंदी वातावरण असेल..? *उद्या त्यांच्या घरी pleasure येणार* ......
आणि यामध्ये माझा काहीच loss होत नव्हता... कारण *मला परमेश्वराने खूप काही दिले आहे. आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर ..*
दुसरे दिवशी 50, 100, 500 च्या *नोटांची जुळवाजुळव करून ती व्यक्ती संध्याकाळी 5 वाजता माझ्याकडे आली*.
सकाळपासून त्याचे पाच वेळा फोन... 'साहेब मी पैसे घेवून येतोय, *पण गाडी कुणाला देवू नका*..'
माझ्या हातात पैसे दिल्यावर, त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली, *की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून* गोळा करून आणलेत....
ऑफरपेक्षा चार हजार *कमी पत्करून पण आम्हाला काहीच वाईट वाटले नाही*, उलट त्याच पैशातील 500 रूपयांची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली, *'घरी जाताना मिठाई घेवून जा....'*
डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेत *तो माणूस pleasure घेऊन गेला*...
आपण सहज reply करतो, 'It's my pleasure'....
पण आज pleasure scooter विकताना कळलं...
*Pleasure म्हणजे काय असतं ते..?*
*जीवनात काही व्यवहार करतांना* फायदाच बघायचा नसतो
*आपल्या मुळे इतरांना मिळालेला आनंद बघायचा असत*.
ओंजळ *आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत* इतरांना त्यातले देता आले पाहिजे
Comments
Post a Comment