गुरुजी
*साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्यावर टोपी…*
*नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन*…
*अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची.*
*कसे आहात गुरुजी?’ वगैरे वास्तपुस्त व्हायची.*
*पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची.*
*विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू,* *गाडी गाडी करत फिरवले जात असलेले सायकलीचे जुने टायर अशा खेळांच्या साऱ्या जिनसा जागीच सोडून!*
*त्या वेळी सातवी पास असलं की गुरुजी म्हणून नोकरी लागायची*.
*काही शिक्षक तर कुग्राम म्हणावं अशा खेड्यात जाऊन शाळा सुरू करायचे.*
*गुरुजींची उपजीविका गावावर अवलंबून असायची.*
*नंतर जेमतेम पगार सुरू झाला. खर्च असा नव्हताच.*
*अगदी गावात असलेला एखादा मोकळा वाडाही गुरुजींना मोकळ्या मनानं उघडून दिला जायचा*.
*सांज-सकाळी कुणाच्याही मळ्यातून हिरव्या पालेभाज्या यायच्या*.
*गुरुजींच्या घराचा कोपरा कडधान्यांनी भरून जायचा.*
*निरशा दुधाचा मोफत रतीब असायचा.*
*गुरुजी ग्रामव्यवस्थेचे अविभाज्य घटक असायचे.*
*कुणाच्या घरी पत्र आलं की त्या घराला गुरुजींची आठवण व्हायची.*
*पोरगं विजार सावरत पळायचं आणि गुरुजींना घेऊन यायचं.*
*तोपर्यंत घरातला बाप्या अंगणात गोधडी टाकायचा.*
*कारभारीण चुलीत तुराट्या घालून चहाचं आधण ठेवायची.*
*गुरुजी येऊन पत्र वाचायचे.*
*थाळाभर चहा समोर यायचा.*
*मग अंधार पडेपर्यंत शिवारगप्पा सुरू व्हायच्या.*
*त्यातच जेवणाची वेळ* *व्हायची*. *गुरुजी उठू लागल्यावर बाप्याचा आग्रह सुरू व्हायचा.*
*कारभारीण दाराच्या आतून पदर सावरत आदरानं म्हणायची : “आता दोन घास खाऊनच जावा की गुरुजी!’ ते ‘नको नको’ म्हणत असतानाच काठवटीत भाकरीची थपथप सुरू व्हायची कंदिलाच्या गढूळ प्रकाशात…*
*खरपूस पापुद्रा आलेली बाजरीची गरमागरम भाकरी, खापराच्या तवलीतलं झणझणीत कोरड्यास, लसूण, मीठ, लाल मिरची घालून पाट्यावर रगडलेला भेळा, गाडग्यात मुरलेलं खारट लोणचं…या अन्नाला मायेची चव असायची.*
*तृप्त पोटानं गुरुजी उठायचे.*
*झोपेनं पेंगुळलेल्या पोराच्या डोक्यावर हात फिरवायचे.*
*बाप्या कंदील घेऊन उठत म्हणायचा: “अंधार हाय…गरमासाचे किरकुडे निघत्यात…चला घरला सोडून येतो.’*
*कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडासारखं ते स्निग्ध प्रेम पाहून गुरुजी भारावून जायचे.*
*
*गावात मुलीला पाहायला पाहुणे येण्यापासून तिचं लग्न लागेपर्यंत गुरुजींची महत्त्वाची भूमिका असायची*.
*दुखणं-पाखणं, अंत्यविधी, सणवार, प्रवचनं-कीर्तनं *अशा प्रत्येक ठिकाणी सूत्रं गुरुजींकडंच असायची.*
*त्या काळी शाळा ही* *देवळात, एखाद्या मोकळ्या घरात, नाहीतर झाडाखाली भरायची.*
*खोडाला खिळा ठोकून त्याला लाकडी फळा लटकवला जायचा.*
*फळ्यावर पुसट उमटलेली अक्षरं विद्यार्थ्यांच्या मनावर* *मात्र गडदपणे उमटायची.*
*गावभर पाढ्यांचा,* *बाराखडीचा आवाज घुमायचा.*
*नंतर पत्र्याच्या, कौलाच्या इमारती झाल्या.*
*गुरुजींना शाळेच्या खर्चासाठी दोन रुपये “सादिल’ म्हणून मिळायचा*.
*डुगूडुगू हलणारं लाकडी टेबल, लांब बाकडं, रेकॉर्ड ठेवायला लाकडाची मोठी पेटी…*
*गुरुजी तीच पेटी खुर्ची म्हणून वापरायचे.*
*पालक तर ठार अडाणी.*
*पोरगं पहिलीत घालायचं* *तर* *जन्मतारीख माहीत नाही*.
*मग मुलगा सहा वर्षांचा झाला आहे किंवा कसं हे* *तपासण्यासाठी गुरुजी त्याचा एक हात डोक्यावरून विरुद्ध बाजूच्या कानाला लावायला सांगायचे.*
*हात कानाला लागला तरच पहिलीत प्रवेश!*
*नावाची-आडनावाची अशीच बोंब असायची*.
*शिंपी, लोहार, सुतार, कुंभार असे व्यवसाय असतील तर तेच आडनाव हजेरीवर लावलं जायचं.*
*आईनं पोराचं नाव दगड्या सांगितलं तर ते तसंच लिहावं लागायचं.*
*लिहिताना गुरुजींनी* *“दगड्या’चा उच्चार “दगडू’ असा केला तर त्याची आई म्हणायची : “दगड्याच लिवा. दगडू म्हणल्यावर त्यो भोकाड वाशितो’!*
*शाळेची घंटा म्हणजे रुळाचा तुटलेला तुकडा असायचा.*
*घणघण असा ओळखीचा आवाज गावभर घुमायचा.*
*वर्गात फरशी नसायची.*
*साधी जमीन.*
*आठवड्यातून एक दिवस वर्ग शेणानं सारवावा लागायचा.*
*गुरुजींचा आदेश आल्यावर आम्ही विद्यार्थी शेण गोळा करायला निघायचो.*
*नदीवरून बादल्या भरून आणण्याचं काम थोराड शरीराच्या मुलांकडं असायचं.*
*तोपर्यंत मुली परकरांचे* *ओचे-कोचे खोवून सारवण्याच्या तयारीत वर्गाच्या चारही कोपऱ्यांत बसलेल्या असायच्या.*
*एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.*
*शाळा सुरू असताना काही* *पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.*
*शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला…*
*करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला…*
*हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला…*
*तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला…*
*हाता-पायांवर मोठाल्या* *लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला…*
*जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला…*
*बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला…*
*तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला,*
*हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला…*
*अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे*.
*गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्चर्य वाटे.*
*शाळा अशा मजेत चालायच्या!*
*आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.*
*अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची*.
*सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते* *फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा* *मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा*.
*खतांच्या गोण्यांपासून दप्तराच्या पिशव्या शिवलेल्या असायच्या*.
*त्या खतांच्या कंपनीचे आम्ही विद्यार्थी* *चालते-बोलते प्रचारक होतो म्हणा ना!*
*अडचणी होत्या*…
*संकटं होती*…
*पण शिक्षण मात्र सकस होतं.*
*गुणवत्तापूर्ण होतं.*
*मात्र, गुणवत्तेच्या* *मूल्यमापनासाठी तेव्हा* *खंडीभर साधनं नव्हती.*
*डोक्यावर व्यवस्थेची* *जीवघेणी उतरंड नव्हती.*
*गुरुजींवर विश्वास होता*.
*
*काळ बदलला. समाज बदलला*.
*विद्यार्थी बदलले. गुरुजी बदलले.*
*सारवणाच्या जमिनी जाऊन* *फरश्या आल्या*.
*भिंती रंगल्या*.
*शाळा मेकअप* *केल्यासारख्या सजल्या*…
*देखण्या झाल्या!*
*संगणक आले*.
*शाळा डिजिटल झाल्या.*
*तंत्रज्ञानानं शिक्षण व्यापलं*
*गुरुजींच्या खिशात डायरीऐवजी मोबाईल आले.*
*प्रोजेक्टरवर अभ्यासक्रम आला*.
*साऱ्याच कवितांना एकच सरकारी चाल पाहून मुलं बावरली*.
*हेडमास्तरांना बसायला देखणी खुर्ची आली; पण तिला असलेल्या अदृश्य काट्यांनी ते अस्वस्थ झाले.*
*मोठं टेबल आलं; पण ते अहवालाच्या कागदांनी गुदमरून गेलं.*
*पोरांच्या अंगावर इंग्लिश धाटणीचे ड्रेस आले*.
*शाळेला कंपाउंड आलं आणि गाव शाळेपासून दुरावत चाललं.*
*
*आता गावाचं गुरुजींवाचून काही अडत नाही*.
*वरून अफाट अनुदान येतं.*
*शाळेत पैसा आला: त्यामागं राजकारण आलं.*
*राजकारणामागं गाव आलं.*
*गावपुढारी शाळेत लक्ष घालू लागले.*
*आठवीपर्यंत कुणाला नापास करायचं नाही…*
*मुलांना मारलं तर गुरुजींना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या सुरू झाल्या*.
*धाक, दरारा, भीती नष्ट झाली*.
*आनंददायी च्या* *नावाखाली जणू स्वैराचारच सुरू झाला*
*कृतीपेक्षा प्रशिक्षणं जास्त झाली.*
*गुणवत्तेपेक्षा मूल्यमापनाची साधनं जास्त झाली*,
*शिक्षकांपेक्षा शिक्षणतज्ज्ञ जास्त झाले.*
*सारं काही जास्त झालं; पण नेमकं काहीतरी कमी असल्याचं जाणवू लागलं…*
*साऱ्या सुविधा असूनही शिक्षणव्यवस्थेत रितेपणा असल्याची भावना दाटून आली आहे…*
*भरल्या घरात एकटेपणा वाटावा तशी*.
*काय ते समजत नाही; पण काहीतरी हरवलंय…!*
🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment