सहृदयी प्रार्थनेची
*सहृदयी प्रार्थनेची*
🥀🔆🌺🌺🔆🥀
*जगात कितीही कलह असो.. अविश्वास थैमान घालो.. कितीही दुष्टप्रवृतींची आव्हाने समोर येवोत, मनुष्याला सुखसंपन्न.. सुशांत.. आनंदी जीवन लाभते ते सुसंगतीने. त्यासाठी सदैव कानावर यावीत मंगल संतांची सृजनवाक्येच.*
*हे देवा, मला निरंतर सत्संग लाभो संत सज्जनाच्याच उपदेशांचाच. त्याने मनाचे पापदोष झडून जातील, ऐहिक सुखोपभोगाचा सर्वस्वी वीट येईल. आसरा लाभो कमळा सारख्या निर्मळ व कोमल संत चरणांचा. त्यांनी दूर केले तरीही मी तिथेच हट्टानेंच राहून संतचरित्रांच्या पवित्र कथेंत रंगून जाईल.*
*हे देवा, माझे मन एवढे निश्चल राहो की, दुष्टांनीं केलेल्या विघ्नांचा उपद्रव दूर होवो. चित्त तुमच्याच भजनांत राहो. त्या निर्मल अंतःकरणाने हृदयाला आत्मज्ञान लाभो. खोटा अहंकार.. अभिमान जावो. आत्मज्ञानाने सर्व पापाचे भस्म होवो.*
*इतरांच्या दोषाकडेही मी यशोदा मातेच्या मातृभावनेने बघो. अवगुणी पोराला वडिल कंटाळले तरीही आईच्या अंतरंगात त्याचे प्रेम कायमच असते. असे गढूळ न होणारे.. गुरूंचे कृपावस्त्र असलेले पवित्र मन मला लाभो.*
*पैलतीर दिसतानाही तुझाच वरदहस्त राहो. हे देवा, तू दयेचा सागर आहेस. संसार सागरातून मला पैलतीराला सुखरुप ने.*
*मराठी काव्यक्षेत्राचे आदर्श मोरोपंतांची ही केकावली. केकावली अर्थातच स्वतः मोर होत त्या मनाने लिहलेल्या पंक्ती.*
🎼🌺🌺🎼
*सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो*
*कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो*
*सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो*
*वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो*
*न निश्चय कधी ढळो उजन्विघ्नबाधा टळो*
*न चित्त भजनी चळो मतीस दुप्त मार्गे वळो*
*स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो*
*पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो*
*नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले*
*स्वतोक पितरा रुचे जरी हि कर दमी रांगले*
*तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे*
*जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे*
*पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे*
*दया मृतर सार्धधी नकुल क:जले त्या किटे*
*प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थीटे*
*म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्मदेचे फीटे*
*कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली*
*पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली*
*सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा*
*लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा*
*दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे*
*रडे शिशुतया सी घे कळवळोनी माता कडे*
*असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे*
*पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे*
*गीत : मोरोपंत*
*Happy Morning* 🌞
Comments
Post a Comment