Generic medicine
Made_in_china चीनमध्ये ‘वो बू शी याओ शेन’ (‘डाइंग टु सव्र्हाइव्ह’) या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणारा हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होऊ शकला, हाही एक चमत्कारच! धनदांडग्या बहुराष्ट्रीय औषध कंपन्या, त्यांची मक्तेदारीतून निर्माण झालेली झोटिंगशाही वृत्ती, प्रचंड नफा कमावण्यासाठी या कंपन्या अवलंबित असलेले गैरमार्ग आणि या सगळ्यात भरडले जाणारे सर्वसामान्य रुग्ण यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नोपनिषदाचा सर्वांगीण ऊहापोह करणारा लेख..* पाच जुलै २०१८. गुरुवारची संध्याकाळ. चीनमधील बीजिंग शहरात थिएटरबाहेर प्रेक्षकांची प्रचंड रांग लागली होती.. ‘वो बू शी याओ शेन’ (‘डाइंग टु सव्र्हाइव्ह’) हा चित्रपट पाहण्यासाठी! गुरुवार म्हणजे कामाचा दिवस. त्यात संध्याकाळची अडनिडी वेळ. तरीही लोक वेळात वेळ काढून या चित्रपटासाठी रांगा लावून होते. नुकत्याच झालेल्या शांघाय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट गाजला होता. दोन तास जागेवर खिळवून ठेवून चित्रपट संपला तेव्हा प्रेक्षक उठून उभे राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात ...