२१ मे चहा दिन

*२१ मे चहा दिन !*
*चहा*☕

*चहा म्हणजे चहा असतो*
*कधीही मिळाला तरी वाह वाह☕☕ असतो*

*उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार☕☕ असतो*.
*कधीही मिळाला तरी वाह वाह असतो*...

*मुंबईत तो पिला जातो*,
*पुण्यात घेतला जातो*,
*कोल्हापुरात टाकला जातो तर*
*नागपुरात तो मांडला जातो*.
*चहा म्हणजे चहा असतो*
*कधीही मिळाला तरी वाह वाह☕☕ असतो*...

*क्षण आनंदाचा असो*, 
*वा आलेल असो*, *टेंशन* 
*आळस झटकायला लागतो तसाच थकवा घालवायला ही लागतो*.
*चहा म्हणजे चहा असतो*
*कधीही मिळाला तरी वाह वाह☕☕ असतो*...

*काहीच काम नसताना पण चालतो, आणि खूप काम असलं तरी पण लागतो*
*गप्पा मारताना जसा लागतो*,
*तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो*.
*चहा ला वेळ नसते पण*,
*वेळेला चहाच लागतो*.
*चहा म्हणजे चहा असतो*
*कधीही मिळाला तरी वाह वाह☕☕ असतो*...

*एक चहाप्रेमी* ☕ कडून 
*चहा दिनाच्या मंगलमय शुभेच्छा !*

☕☕☕☕☕☕☕

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

निवृत्ती वेतनाचे प्रकार

पुण्यातील पेठांची यादी व माहिती (इतिहास)