असफल प्रयत्नांचा नियम

*असफल प्रयत्नांचा नियम*

आपल्या माहिती आहे का , सिंह हा जंगलाचा राजा असून देखील त्याच्या शिकारीच्या प्रयत्नापैकी फक्त 25% प्रयत्न यशस्वी होतात आणि 75% अयशस्वी. 

सफलतेचे प्रमाण कमी असले तरी सिंह किंवा इतर प्राणी शिकार करायचे, पाठलाग करायचे किंवा शोध घेण्याचे थांबवत नाहीत. आपल्याला काही जणांना वाटेल की फक्त भूक हेच कारण आहे असे वाटले असेलही. पण असफल प्रयत्नांचा नियम हा जन्मतः प्राण्यामध्ये असतो की ज्यामुळे ते थांबत नाहीत. या नियमावरच निसर्ग ही चालतो.

निम्याहून अधिक माश्याचे अंडे ही  खाल्ली जातात. अस्वलाच्या पिल्लाबद्दल हे ते जन्म घेण्याआधिच मृत्यू पावतात. जगात पडणारा जास्तीत जास्त पाऊस हा समुद्रातच पडतो. झाडाच्या बिया देखील निम्याहून अधिक पक्षाकडून खाल्या जातात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार झाडे, प्राणी आणि इतर नैसर्गिक जे बल आहेत त्याना या असफल प्रयत्नाचा नियम अंगीकारूण घेतलेला आहे. *फक्त माणूस असे समजतो की यशाचा अभाव म्हणजे असफलता आहे, पण खर तर हे आहे की, आपण जेव्हा आपले प्रयत्न थांबवतो तेव्हा आपल्याला अपयश येते.*

यश म्हणजे असा रस्ता नाही की जिथे अडथळे किंवा खड्डे नाहीत. यश म्हणजे असा रस्ता ज्या मध्ये खड्डे व अडथळे हे असणारच पण ते कसे पार करून आपण पुढे जातो आणि नविन रस्तावर चालू लागतो. हे अडथळे आणि खड्डे म्हणजेच आपण केलेल्या चुकातून शिकून पुढे जाणे. यातील काही प्रयत्न वाया ही जातील पण वाया जरी गेले तरी प्रयत्न करत राहणे यावर आपले यश अवलंबून आहे.

*या सर्वाचा सारांश असा की, आपण जे काम करत आहात ते खंड न पडता चालू ठेवा, यश नक्की मिळणार*

# *असफल प्रयत्नांचा नियम*

*शुभ सकाळ*🌹

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार