भाषेत एवढी विशेषणं

*आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?*

*लुसलुशीत*- पोळी/ पुरणपोळी 
*खुसखुशीत*- करंजी
*भुसभुशीत*- जमीन
*घसघशीत*- भरपूर
*रसरशीत*- रसाने भरलेले
*ठसठशीत*- मोठे
*कुरकुरीत*- चकली, कांदा भजी
*चुरचुरीत*- अळूवडी
*झणझणीत*- पिठले, वांग्याची भाजी
*सणसणीत*- मोठया आकाराची पोळी, भाकरी, पराठा
*ढणढणीत*- मोठ्या आवाजात लावलेले संगीत
*ठणठणीत*- तब्येत
*दणदणीत*- भरपूर 
*चुणचुणीत*- हुशार
*टुणटुणीत*- तब्येत
*चमचमीत*- पोहे, मिसळ
*दमदमीत*- भरपूर नाश्ता
*खमखमीत*- मसालेदार
*झगझगीत*- प्रखर
*झगमगीत*- दिवे
*खणखणीत*- चोख
*रखरखीत*- ऊन
*चटमटीत/ चटपटीत*- खारे शंकरपाळे, भेळ
*खुटखुटीत*- भाकरी/ दशमी
*चरचरीत*- अळूची खाजरी पाने
*गरगरीत*- गोल लाडू
*चकचकीत*- चमकणारी गोष्ट
*गुटगुटीत*- सुदृढ बालक
*सुटसुटीत*- मोकळे
*तुकतुकीत*- कांती
*बटबटीत*- मोठे डिझाइन
*पचपचीत*- पाणीदार
*खरखरीत*- रफ
*खरमरीत*- पत्र
*तरतरीत*- फ़्रेश
*सरसरीत/सरबरीत*- भज्यांचे पीठ
*करकरीत*- सफरचंद, पेरूच्या फोडी
*झिरझिरीत*- पारदर्शक
*फडफडीत*- मोकळा भात
*शिडशिडीत*- बारीक

*मिळमिळीत*- कमी तिखट मसाला असलेला पदार्थ
*गिळगिळीत*- मऊ लापशी
*बुळबुळीत*- ओलसर चिकट वस्तूचा स्पर्श
*झुळझुळीत*- साडी
*कुळकुळीत*- काळा रंग
*तुळतुळीत*- टक्कल
*जळजळीत*- टिळकांचे अग्रलेख
*टळटळीत*- दुपारचे रणरणते ऊन
*ढळढळीत*- सत्य
*डळमळीत*- पक्के नसलेले
*गुळगुळीत*- स्मूथ
*गुळमुळीत*- स्पष्ट न बोलणे

ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा....

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

निवृत्ती वेतनाचे प्रकार

बुद्रुक आणि खुर्द ह्या शब्दांचा अर्थ काय?