अर्थ जीवनाचा

"अर्थ जीवनाचा"
यशाला इथे अनेक वाली 
अपयश मात्र दैवाचे हवाली 
आनंद येथे असे थेंबा परी 
दुःखाच्या मात्र भरती घागरी 
कृतज्ञता इथे अश्रु ढाळी 
कृतघ्नांचा वेलू जाई आभाळी
कष्टकऱ्यांची रिकामीच थाळी
ऐशोआराम दलालांचे भाळी
कष्ट तो एक अनामिक कुणी
भलताच होतो पुरस्काराचा धनी
न्याय इथला असे आंधळा 
न जाणतो तयास म्हणती वेंधळा
असा अज्ञांचा येथे तांडा चालला
जीवन संपलेतरी अर्थ न उमगला
जीवन असू द्यावे वाहत्या सरीते परी
फुल द्या आनंद ताटवे तिच्या किनारी
थांबण्याचा जरी झाला अनिवार मोह
भरून जाऊ द्या आनंदाचे डोह...
       .... विकास रामगुडे

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार