उपचार डिटाक्सिफिकेशनचे
* होम क्वारंटाईनमध्ये काय काळजी घ्यावी त्यांच्या मी टीप्स पाठवीत आहे. त्यातील जमेल तेवढे जास्तीत जास्त वेळा करा.
* हे सर्व उपचार डिटाक्सिफिकेशनचे आहेत व शरीर आतून जसजसे स्वच्छ, शुद्ध व पवित्र होत जाईल (Internal Cleanliness, Purity and Sanity) तसतसे स्वास्थ्य सुधारत जाईल.
*कारण ही शरीरात साचून राहिलेली विजातीय विषद्रव्ये हाच खरा रोग असून त्यांच्या विघटनाच्या म्हणजेच सडण्याच्या प्रक्रियेतूनच हे जंतू म्हणा, bacteria म्हणा, बुरशी म्हणा किंवा व्हायरस म्हणा हे निर्माण होत असतात.
*शरीर मल, मूत्र, घाम व कुपित वायू या द्वारे आतडी, मूत्रपिंडे, त्त्वचा व फुप्फुसे यातून सतत त्यांचा निचरा करून आपले स्वास्थ्य कायम राखीत असते.
* आपण फक्त त्या संबंधित सवयींचा अंगिकार करायचा इतकेच. विचार करा व काळजी घ्या. ती माहिती पाठवीत आहे.
धन्यवाद !
All The Best !
*DIET INTAKE*
१. आपण दोन वेळा जेवतो, तेव्हा दोन वेळा व्यवस्थित मलविसर्जन झालेच पाहिजे.
*दोन जेवणात ६ ते ८ तासांचे अंतर ठेवा.
रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यात ३ तासांचे अंतर ठेवा.
* त्यासाठी दोन्ही जेवणात भरपूर कोशिंबीर (फक्त काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, नारळाचे खोबरे, कोथिंबीर इतकेच नव्हे तर त्यात २-३ कच्च्या भाज्याही असाव्यात व रोज भाज्या व त्यांचे प्रमाण बदलत जावे.)
* शिवाय एक पालेभाजी, एक मोड आलेले कडधान्य व हिरवी चटणी (पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता हे मुख्यतः). या सर्वांचे प्रमाण रोजच्या पेक्षा भरपूर असावे.
* एक पेरू किंवा बियांसह डाळिंब, सालीसह चिकू, अननस अशा भरपूर चोथा असलेल्या फळांपैकी एक.
* पोळी, चपाती ऐवजी भाकरी.
भात शक्यतो नकोच, घेतलाच तर बिनसडीत व त्यात पालेभाजी किंवा कोशिंबीर कालवून.
२. नाश्ता किंवा मधल्या वेळच्या खाण्यात शहाळ्याचे पाणी
* लिंबू-पाणी (सरबत नव्हे) एक ग्लास पाण्यात फक्त चतकोर लिंबू,
* ३-४ भाज्यांचा एकत्रीत रस किंवा सूप, रसदार फळे यापैकी काहीही.
* दिवसातून ३ वेळा, सकाळी, दुपारी व रात्री, तुळस, गवती चहा, आले, किंचित मिरी पावडर व गूळ यांचा काढा.
*WORKOUT*
#Care for Body#
३. रोज किमान ४५ ते ६० मिनीटे भरपूर घाम येईपर्यंत व्यायाम, तो करताना व दिवसभर ही भरपूर दीर्घ श्वसन
* व्यायाम कोणताही करा पण त्याचा शेवट पोटाच्या व्यायामानेच करावा.
*DETOX*
#Care for Excretion#
४. दिवसातून एकदा गार पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा , सुमारे २५० ते ५०० मिली पाण्याचा एनिमा घ्यावा.
* एनिमाचे भांडे २ ते अडीच फुटांपेक्षा जास्त उंचीवर टांगू नये.
* आठवड्यातून एक दिवस फक्त पाणी पिऊन उपवास. काही कारणांमुळे ते शक्यच नसेल तर, लिंबू पाणी किंवा शहाळ्याचे पाणी किंवा फळांचा रस किंवा भाज्यांचे सूप असा रसाहारा वरचा उपवास. मात्र त्या दिवशी दोनदा, अधल्या दिवशी सायंकाळी व दुसऱ्या दिवशी सकाळी एनिमा नक्कीच घ्यावा.
*रात्री सलग ७ ते ८ तासांची झोप घ्या जाग आल्याशिवाय सकाळी उठू नका.
*HYDROTHERAPY*
#Care for Digestion#
५. दोन्ही वेळा भोजनानंतर गार पाण्यात पिळलेला पातळ पंचा पोट व कमरेभोवती गुंडाळावा व सुमारे दोन तासांनी काढावा. रात्रीचा सकाळी काढला तरी चालेल.
*STEAM*
#Care for Respiration#
६. दुपारी व रात्री झोपण्यापूर्वी पातेल्यात पाणी घेऊन त्यात पसाभर कोबीच्या पानांचा किस व आर्ध्या लिंबाचा रस घेऊन, ते उकळून डोक्यावर पांघरूण घेऊन त्याचा भरपूर वाफारा घ्यावा.
*JALNETI*
#Care for Respiration#
७. पूना हास्पिटल जवळील विवेकानंद केंद्रात जलनेतीचे भांडे मिळते, त्याने नाकातून गार पाण्याची जलनेती दिवसातून ४-५ वेळा करावी.
*CONTACT* to
अधिक माहिती व शंका-समाधानासाठी संपर्क -
डॉ. अशोक झंवर ९९२२७६००९५ ashokbj49@yahoo.co.in
Comments
Post a Comment