रुग्णाच्या नातेवाईकांना मदतीचा हात

पुण्यात यांची सेवा ऊपलब्ध आहे


रुग्णाच्या नातेवाईकांना मदतीचा हात

आज कालच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेकांनी "स्मॉल एँड स्वीट" म्हणुन छोट्या कुटुंबाला प्राधान्य दिलेल आहे.. आजी/आजोबा, सुन/मुलगा आणि एखाद नातवंड  अशा घरातील कोणी हॉस्पिटल मधे एडमिट असते तेंव्हा  किंवा घरातल्या आजारी वृध्दांची काळजी घेत असतात तेंव्हाु घरातल्या मंडळींची खुप धावपळ उडते अशा वेळी मिळालेला मदतीचे हात खूप दिलासा देऊन जातो.
bcare4u या ग्रुप तर्फे २६ जानेवारी २०१९ रोजी * "मोफत वृध्द व रुग्ण सहायता स्वयंसेवक सेवा"* उपलब्ध करुन देणा-या एका अनोख्या सामाजिक उपक्रमाची मुहूर्त मेढ रोवली* 

घरी किंवा हॉस्पिटल मध्ये असलेल्या रुग्णांची व वृध्दांची काळजी घेतांना घरातील मंडळींची धावपळ उडते 
* हीच गरज ओळखुन *
"सर्वां साठी मोफत वृध्द व रुग्ण सहायता स्वयंसेवक सेवा"*
 उपलब्ध करण्यात आली आहे.*
या अंतर्गतपुढील सेवा देण्यात येतील :->>
*१) हॉस्पिटल मधे अॅडमिट असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना त्यांच्या गरजे नुसार रिलिव्हर अटेंडंट म्हणुन हजर रहाणे.*
*२) कोणाच्या घरी वृध्द व्यक्ती अथवा बेड रिडन पेशंट असतील आणि घरातील कुटुंबियांना त्यांच्या बाहेरील दैनंदिन कामा साठी किंवा नोकरी साठी बाहेर जायचे असेल तर घरी ही कोणीतरी गरजे नुसार हजर रहाणे.*
 ही सेवा सध्या पुण्यातील विविध हॉस्पिटल्स व भागां मध्ये उपलब्ध करण्यात येत आहे.
या सेवेची मागणी लक्षात घेता स्वयंसेवकांची संख्या विभाग निहाय वाढणे आवश्यक आहे.
या साठी विविध भागातील स्वयंसेवकांची फळी उभी केली जात आहे, यात स्वयंसेवक म्हणुन काम करु इच्छीणा-यांना नम्र आवाहन त्यांनी खाली दिलेल्या नंबर्स वर संपर्क साधावा...
*तसेच, सर्वांसाठी मोफत असणा-या या सेवेचा लाभ ज्या गरजु व्यक्ती घेवू इच्छितात त्यांनी किमान एक दिवस आधी खालील नंबर्स वर संपर्क साधल्यास कोणीही ह्या सेवेचा लाभ घेऊ शकते.*  
त्या साठी हा मेसेज जास्तित जास्त लोकां पर्यंत पोहचविणे जरुरी आहे. या साठी सगळ्यांनी प्रयत्न करुया.
 * ह्या सेवेचं रूपांतर टप्या टप्याने  *"Time Bank - टाईम बँक"*  ह्या एका अत्यंत सुंदर संकल्पनेत होणार आहे. 
 *<- : संपर्क : ->*
*१.  श्रीरंग पाळंदे.*
     *88888 02981*
*२.  माधवी ठाकुरदेसाई.*
     *72767 97124*
*३.  अस्मिता पटवे.*
     *93726 25899*

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार