*पाऊल व पाय
*
*पाऊल व पाय* दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..
*पाऊल नाजूक* ..व
*मुलायम..* तर *पाय भक्कम* अन् *मजबूत* असावा लागतो..!
*पाऊलखुणा* उमटतात तर *पायांचे ठसे ...!!*
*पाऊलवाटेवर* कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण *पायवाट* ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..!
*पाऊल जपून टाकायचे* असते; पण *पाय हा रोवायचा* असतो.. !!
काय कमाल आहे बघा..
नावडत्या व्यक्तीच्या घरी *"कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही"* असे म्हणतो; पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र *आपला पाय लवकर निघत नाही..!!☺*
नको त्या ठिकाणी *पाऊल घसरते* तर बहारदार संगीत मैफिलीत *पाय रेंगाळत राहतो !*
*पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !*
जीवनात किंवा व्यवसायात टाकलेले *पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो* तर येणार्या अनुभवांमुळे *आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट* ही अटळ व गरजेची असते... *...!*
बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही........
...........
जन्माला येताना स्वतःच्या *पावलांनी* न येणारे आपण ,...परत जातानादेखील आपल्या *पायांनी* मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत *साम्य* आहे...!
☺
Comments
Post a Comment