ती शेवटची पिढी
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत , मातीच्या घरात जन्मलो...*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत, वीज नसताना दिव्याच्या प्रकाशात वहीची पानं खट क्याच्या पेनांन गिरवली....*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत , शाळेतून वायरी च्या दप्तराच ओझ कोपऱ्यात टाकून शिळी भाकरी ,तेल चटणी खाल्ली..*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत, मे च्या सुट्टीत रखरखत्या उन्हात रानमेव्याचा आस्वाद घेत विहिरी पालथ्या घातल्या...*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत.. ज्यांनी पावसाळ्यात छत्री, रेनकोट ऐवजी पोत्याची खोप घेतली.*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत, उन्हाळ्यात पळसाचं चप्पल, पावसाळ्यात चिखलाची जाड चप्पल. मिरवत निसर्गाचा आनंद लुटला..*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत. पावसाळ्यात थंडीचा पाऊस पडताना आजीच्या उबदार गोधडीत वाघाच्या, भुताच्या गोष्टी ऐकल्या...*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत, गल्ली बोळात लपाछपी खेळतोय..*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत, गोटि चा खेळ , MRF च बॅट नसताना बांबूच्या दांडक्याने क्रिकेट खेळलो...*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत ,... Led- LCD , mobile नसताना सेल वरच्या रेडिओचा आनंद घेतला.*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत , जेव्हा सुझुकी, बुलेट. नव्हती , तर एक रुपयाला तासभर फिरणारी भाड्याची सिंगल सीट सायकल होती..*
*आम्ही ती शेवटची पिढी आहोत,. कॉइन बॉक्स वर 1रुपयात आपुलकीचं बोलण व्हायचं..*
*कुठे तरी हरवलं ते व्यवहाराचा आणि भौतिकतेचा स्पर्श नसलेलं *निरागस बालपण* ..
*आपल्या चिमुकल्यांना या भौतिक आणि यांत्रिक जगातून बाहेर खेचून आपल्या *पिढीने अनुभवलेले* ते *क्षण जरा कथन करा . क्षणभंगुर का होईना गतकाळात जायला मिळेल..
Comments
Post a Comment