खानदेशातील खेड्यात

पुण्यातली एक शिक्षिका खानदेशातील खेड्यात बदलून गेली. तिने शाळेत मुलांना सामान्य ज्ञानावर काही प्रश्न विचारले…  मुलांनी दिलेली उत्तरे वाचा--

*शिक्षिका :* पाच नात्यांची नावे सांगा.

*विद्यार्थी :* डिकरा-डिकरी, आंडोर-आंडेर, चुलता-चुलती, देर-जेठ, जिजी-फुआ, जिभाऊ-भावजई, आजला-फुई, नंदेभाऊ, भासा, ननीन-जवाई, धल्ला-धल्ली.

*शिक्षिका :* अच्छा… आता काही प्राणी, पक्षी सांगा..

*विद्यार्थी :* दोबड, हेला, गावडी,धांड्या, पाल्ली, पायडू, वासरी, बोकड्या, पाठोडी, गधडं, ससं, कोल्हं, कापोटी बच्चं, कुतरड बोख्या, सैड्या
*पक्षी :* हाड्या,  चिडी, तितुर, लावरी, टिटोई, घुब्बड.

*शिक्षिका :* आता भाज्या सांगा…

*विद्यार्थी :* डबुक वडा, उडिद न घोटे, भजिसन बट्ट, कोंडाळ, वडा न बट्ट,  खुडा.

*शिक्षिका :* दिशा सांगा.

*विद्यार्थी :* हेट्या, वऱ्हा, बांदे बांदे, नदिना आंगे, लवने लवने.

*शिक्षिका :* झोपताना आपण काय वापरतो?

*विद्यार्थी :* झावर, गोधडी, खाटलं, गदल, उशी.

*शिक्षिका :* घरात कोणकोणती भांडी असतात?

*विद्यार्थी :* गुंडा, सांची, खुरपी, तावा, रांजन, तमान, थाटी, पावशी, घट्या गल्लास, रोटपाट, दबड्ड, फुकनी, तिपडी, गंजी, पीशी.

*शिक्षिका :* खेळांचे प्रकार सांगा…

*विद्यार्थी :*  चुलापाटी, भांडाभांडा, इट्टीडांडू, आळीसुळी, घोडीघोडी, गोलगोल रानी, गोट्या...

*वाद्य :* धुमड, दफड, पिंगानि, सामळ, ढोलक, धतड पतड, गुबुगुबु 

*शिक्षिका अजूनही डिक्शनरीत अर्थ शोधते आहे!*
😁😀😀

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार