पैसा, पैसा, पैसा, पैसा
**निबंध*
*मी पैसा बोलतोय*
*सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो,*
*👉मी आहे पैसा.* माझ रूप साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे.
👉मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो.
👉आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात.
👉आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईटक्ष गोष्टीत कधीच फरक करत नाही,
👉परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात.
👉मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात.
👉हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात.
👉खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत.
👉मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाहि जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.
👉मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळ विकत घेऊन देऊ शकतो.
*👉मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो .......*
..... पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.
*👉मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो ......*
.....पण तुमच वय नाही वाढऊ शकत.
*👉मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो .......*
.....पण गेलेली वेळ नाही.
*👉मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो ......*
.....पण आदर नाही.
*👉मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो ....*
.....पण शांत झोप नाही.
*👉मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो .....*
.....पण विद्या नाही.
*👉मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो ......*
.....पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.
म्हणून लक्षात ठेवा
*पैसा हेच सर्वस्व नाही*
*पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका* .
पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका.
माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.
*आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ हेच आपले धन आहे.*
त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हाला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत.
*तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्यांना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे. तेव्हा सेवा, साधना करा.*
मग आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार............
धन्यवाद !
आपला.
*पैसा, पैसा, पैसा, पैसा*
Comments
Post a Comment