ब्रेक्स

*ब्रेक्स*
एकदा फिजिक्सच्या टिचरने मुलांना प्रश्न विचारला,
" कारमधे *ब्रेक्स* का लावलेले असतात ? "

त्यावर निरनिराळी उत्तरे आली.
*" थांबण्यासाठी "*

*" वेग कमी करण्यासाठी "*

*" अपघात टाळण्यासाठी "*

परंतू सर्वात चांगले उत्तर होते
*" जास्त वेगाने जाता येण्यासाठी!! "*
असे कसे ? जरा विचार करा.

जर तुमच्या कारमधे *ब्रेकच* नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल?
*नाही कदापि नाही*
कारण कारला *ब्रेक* आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता.

तुमच्या जीवनातही तुम्हाला *आई वडील, शिक्षक, भाऊ, बहिण, नातेवाईक, आप्तस्वकिय, मित्रमंडळी, शेजारीपाजारी* इ. रूपात *ब्रेक्स* मिळतात. ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला चीड आणतात.

परंतु लक्षात ठेवा, जीवनात वेळोवेळी आलेल्या अशा *ब्रेक्समुळेच* तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे *ब्रेक्स* नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.

म्हणूनच जीवनात अधुनमधून येणाऱ्या अशा *" ब्रेक्सची "* जाण ठेवा.

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार