पाणी साठा

L

*धरणांतील पाणी साठा किंवा पाणी वहन याबाबत विशिष्ट परिमाण आहेत.*
*पाणी साठा हा* 👇

*1 मि मी*

*1लिटर,*

*1लक्ष लिटर,*

*1दश लक्ष लिटर,*

*1 घनफुट पाणी,*

*1MCFT(million cubic feet)*

*TMC,(Thousand Million Cubic)*

*अशा एककात मोजला जातो.*

यात 👇

*दश लक्ष लिटर म्हणजे दहा लाख लिटर,*

*दश लक्ष घनफुट म्हणजे मिलियन क्यूबिक फूट*

*1 घनफुट पाणी म्हणजे 28.32 लिटर,*

*1 MCFT म्हणजे 2 कोटी 83 लाख 20 हजार लिटर पाणी*

*आणि*

*1000 MCFT म्हणजे 1 TMC पाणी*

🙏

*1) चणकापूर 2300 MCFT आहे ,*

*म्हणजे 2.3 TMC आहे.*

*2) गिरणा डॅम 21000 MCFT आहे,*

*म्हणजे 21 TMC आहे.*

*3) गुजरातचे तापी नदीवरील उकई धरण 280,000 MCFT आहे,*

*म्हणजे 280 TMC आहे.*

*4) नर्मदा सरोवर 315,000 MCFT आहे,*

*म्हणजे 315 TMC आहे.*

🙏

*धरण पाणी आवक जावक माप बघा किती पाणी येते जाते माहिती आहे का ?*

*1) TMC म्हणजे काय ?*

*2) Cusec म्हणजे काय ?*
*3) Cumec म्हणजे काय ?*

*उत्तर*

*सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, खान्देश चा पर्जन्य छायेचा भाग सोडून धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणी सोडले जात आहे.*

*इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो.*

*याचा नेमका अर्थ काय?*

*आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.*

*१) 1 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.*

*1 tmc = 28,316,846,592 litres*

*२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.*

*३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.*

उदा.
*पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.*
*म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.*

*याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.*
*म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडले जात आहे.*

🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

  1. 100 फूट×100फूट×10 फूट आकाराच्या शेततळ्या मध्ये किती लिटर पाणी बसु शकते?

    ReplyDelete
  2. 28 लाख 31 हजार 700 लीटर पाणी बसेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

निवृत्ती वेतनाचे प्रकार

पुण्यातील पेठांची यादी व माहिती (इतिहास)