मराठीही फारशी सोपी नसावी.

मराठीही फारशी सोपी नसावी...

१. *विधान* सभेतील मंत्र्यांचे *विधान* चांगलेच गाजले.
२. फाटलेला शर्ट *शिवत* नाही तोपर्यंत मी त्याला *शिवत* नाही.
३. भटजी म्हणाले, *करा* हातात घेऊन विधी सुरू *करा.*
४. धार्मिक *विधी* करायला कोणताही *विधी* निषेध नसावा.
६. अभियंता मला म्हणाला, इथे *बांध* *बांध*
७. उधळलेला *वळू* थबकला, मनात म्हणाला, इकडे *वळू* कि तिकडे *वळू*
८. कामासाठी भिजवलेली *वाळू* उन्हाने *वाळू* लागली.
९. दरवर्षी नवा प्राणी *पाळत* मी निसर्गाशी बांधिलकी *पाळत* असतो.
१०. पुस्तकातले वाक्य *गाळणे* हातात *गाळणे* पकडण्याइतके सोपे नाही.
११. फुलांच्या *माळा* केसांत *माळा*.
१२. *गळू* फुटले, पू *गळू* लागला.
अजून काही.......
१. म्हणे *शिरा* खाल्ल्याने  *शिरा* आखडतात.
२. *काढा* पिऊन मग एक झोप *काढा*.
३. *हार* झाली की *हार* मिळत नाही.
४. एक *खार* सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर *खार* खाऊन आहे.
५. *पळ* भर थांब, मग पळायचे तिथे *पळ*.
६. *पालक* सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात  मेथी, *पालक* इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.
७. *दर* वर्षी काय रे *दर* वाढवता?
८. *भाव* खाऊ नकोस, खराखरा *भाव* बोल.
९. नारळाचा *चव* पिळून घेतला तर त्याला काही *चव* राहत नाही.
१०. त्याने *सही* ची अगदी *सही* *सही* नक्कल केली.
११. *वर* पक्षाची खोली *वर* आहे.
१२. खोबर्‍यातला मुलांचा *वाटा* देऊन मग बाकीच्याची चटणी *वाटा*.

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार