_*म्हणून "ब्रेक" चा आदर करा.
❗ _*म्हणून "ब्रेक" चा आदर करा...!*_
_*LetsUp I Motivational Katta*_
🚗 एकदा फिजिक्सच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले, "कारमध्ये ब्रेक का असतात?" विदयार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. काही म्हणाले "थांबण्यासाठी", काही म्हणाले "गती कमी करण्यासाठी" तर कुणाचं उत्तरं होत "टक्कर टाळण्यासाठी" ब्रेक असतात. पण सर्वोत्तम उत्तर होते, "आपल्याला जलदगतीने चालविण्यास सक्षम करण्यासाठी".
🤔 शिक्षक उत्तराने समाधानी झाले आणि म्हणाले गृहीत धरा कि, आपल्या कारमध्ये ब्रेक्स नाहीत आणि असे गृहीत धरले तर आपली गाडी किती वेगाने चालविली जाईल? नक्कीच ब्रेक नसल्यास आपल्याला वेग कमी ठेवावा लागेल जेणे करून अपघात होणार नाही. आपल्याला अपेक्षित ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी कारची गती वाढविणे गरजेचे असते जे या ब्रेक मुळेच शक्य आहे.
🧐 आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपणास आपले पालक, शिक्षक, हितचिंतक किंवा मित्र आपली प्रगती, आपली दिशा किंवा आपले निर्णय याविषयी प्रश्न विचारतात. कधी-कधी आपल्याला ते त्रासदायक वाटत, कधी-कधी त्यांनाच आपण आपल्या आयुष्याचे "ब्रेक" समजण्यास सुरुवात करतो.
🤝 परंतु, लक्षात ठेवा, अशा "ब्रेक" मुळेच आज आपण जिथे आहोत किंवा जिथे आहात तिथे पोहोचण्यात यशस्वी झाला आहात ते अशा "ब्रेक" मुळेच शक्य आहे. या ब्रेकशिवाय आपण आपल्या आयुष्यावरच नियंत्रण हरवून बसूच परंतु, भयानक अपघातानाही आपल्याला सामोरे जावे लागले असते. म्हणून आयुष्यात अशा "ब्रेक" चा आदर करा. त्यांचा योग्य पद्धतीने वापर करा.
( _*अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_ https://goo.gl/MDEfS5)
Comments
Post a Comment