प्रेरणा कशास म्हणतात
*●प्रेरणा कशास म्हणतात●*
*न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते...!!!!*
*आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता...!!!!*
*बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे...!!!!*
*यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते...!!!!*
*मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले...???*
*तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते...!!!!*
*शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती...???*
*तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या...???*
*आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता...???*
*हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते...!!!!*
*मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते...!!!!*
*सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते...!!!!*
*आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो...!!!!*
*आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो...!!!!*
*भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो...!!!!*
*पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो...!!!!*
*पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो...!!!!*
*माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का...???*
*कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का...???*
*वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का...????*
*लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का...???*
*आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का...???*
*निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो...!!*
*प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो....!!*
*शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो...!!*
*आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो...!!*
*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा *शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो..
Comments
Post a Comment