मुलांचे संगोपन

मुलांशी संवाद साधताना त्यांच्या काही गरजांचा विचार करायला हवा.  वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांच्या काही वेगवेगळ्या गरजा असतात. 
मुलं अगदी लहान असताना, म्हणजे तान्ही असताना, त्यांच्या मनात ह्या जगाबद्दल विश्वास निर्माण होणं गरजेचं असतं. मुलांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यातून, त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देण्यातून आपण हा विश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. ह्या काळात  गरज असते ती मुलांना सुरक्षित वातावरण देण्याची. security ची. आपण नेहमी safety आणि security ह्या दोन संकल्पना एकच आहेत असे समजतो. आणि मुलांना safe ठेवण्याचा प्रयत्न म्हणजेच security असे समजतो. खरंतर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. safe असणारे मूल secure असेलच असे नाही. security म्हणजे आपण safe असणार आहोत हा विश्वास. म्हणूनच,  हे सुरक्षित वातावरण म्हणजे मुलांना bubble wrap करणं नव्हे.  मुलं उंचावरून पडणार नाहीत, स्वच्छ, आरोग्यपूर्ण वातावरणांत राहतील, आयुष्यभराची दुखापत होणार नाही ह्याची काळजी घ्यायलाच हवी. पण ह्याही पुढे जाऊन हे जग चांगलं आहे आणि तुही चांगला आहेस, तू स्वत्:ची काळजी घेऊ शकतोस हा विश्वास निर्माण  करायला हवा. हा विश्वास म्हणजेच म्हणजे security.  बरेचदा, मुलांना safe ठेवण्याचा अतिरेक होतो आणि हा विश्वास त्यांच्या मनात निर्माणच होत नाही.  मुलांच्या मनात insecurity  निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, कडक शिस्त.  आपलं चुकणार आहे हि भीती किंवा चुकलं नाही तरी आपलं वागणं कुणालाच आवडत नाही अशी शंका मुलांच्या मनात insecurity निर्माण करते.  मुलांकडे अजिबातच लक्ष न देणेही  मुलांना insecure  करते.  मुलं जेव्हा insecure होतात तेंव्हा सगळ्यात आधी आत्मविश्वास गमावतात.  त्यांचे कुटुंबियांशी चांगले संबंध तयार होऊ शकत नाहीत. मनात jealousy निर्माण होते.  तणावाला सामोरे जातात. लोकांमध्ये मिसळणं टाळतात.  insecure असणारी मुलं अभ्यासात मागे पडल्याचं आपल्याला दिसून येईल. दोन भावंडांची भांडणं हि insecurity मुळेच होतात. त्यांच्या व्यक्तिमत्वावरच ह्याचा परिणाम होतो.  मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा तर त्यांना secure वाटायला हवं.  त्यांना secure वाटण्यासाठी त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा. त्यांच्याशी  गप्पा मारा. त्यांचं कौतुक करा. मुलांना ते  करत असणाऱ्या निरनिराळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देणं, फार आवश्यक ठरतं.  मुलांच्या  वारंवार चुका काढणं, perfectionism चा आग्रह,  त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या अपेक्षा त्यांना यशापासून मागे ओढतात.  सकारात्मक रीतीने बोला. अतिकाळजी करणे टाळा, मुलांना स्वावलंबी बनवा.  

Vasudha Deshpande-Korde
( Psychology), M.Sc.(Psychology)(UK) MBA (HR)(UK).
Mindmaster counsellors,
Ganesh corner, Mahesh Society,
Bibwewadi, Pune
9225505369

Comments

Popular posts from this blog

मराठा समाजाची सर्व ९६ kule

सहावे सुख

निवृत्ती वेतनाचे प्रकार