मी अजूनही शिकतोय !
*मी अजूनही शिकतोय !* *दोन्हीची कॉकटेल बनवली तर आयुष्य सुखाचे होईल !!* आधीच्या पिढीकडून *पैसे वाचवायला शिकलो;* नंतरच्या पिढीकडून *पैसा वापरायला शिकतोय.* आधीच्या पिढीकडून सहवासाने *नाती जपायला शिकलो;* नंतरच्या पिढीकडून *डिजिटली नवीन नाती जोडायला* शिकतोय. आधीच्या पिढीकडून *मन मारून जगायला शिकलो;* नंतरच्या पिढीकडून *मन भरून जगायला* शिकतोय. आधीच्या पिढीने, *Use and use more* मधली उपयुक्तता शिकवली; नंतरच्या पिढीकडून *Use and throw* मधली नावीन्याची *गंमत अनुभवायला* शिकतोय. आईकडून पिकनिकलाही *घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला* शिकलो; मुलांकडून *घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला* शिकलोय. आधीच्या पिढीबरोबर *निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला;* नंतरच्या पिढीबरोबर *मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला* लागलो. आधीच्या पिढीने बिंबवले, *घरचेच लोणी सर्वात उत्तम;* नंतरची पिढी पटवून देत आहे, *अमूल बटरला पर्याय नाही*. थोडक्यात काय, *आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते;* तर नंतरची पिढी शिकवत आहे, *मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !!*😊