Posts

Showing posts from February, 2020

बबड्या

एखाद्या कुटुंबातल्या मुलाचा *बबड्या* कसा होतो? हा खरोखरच आवर्जून वेळ काढून अभ्यासण्यासारखा विषय आहे. वयाची विशी उलटून गेलेल्या आपल्या बबडूच्या अंथरूणाची घडी घालणं, बेडवरची विस्कटलेली बेडशीट व्यवस्थित घालणं, बबडूचे कपडे धुवायला टाकणं, त्याच्या खोलीतलं टाॅयलेट स्वच्छ करणं, चहा-काॅफी-दूध-नाश्ता सगळं सगळं अगदी हातात आणून देणं, बबडूला डबा देणं, रोज संध्याकाळी त्याच्या सॅकमधून तो डबा काढून धुवून ठेवणं, बुटात तसेच राहीलेले किंवा इतरत्र पडलेले पायमोजे शोधून धुवायला टाकणं इत्यादी कामं रोजच्या रोज अगदी नियमितपणे करणाऱ्या आया मी पाहिल्या आहेत. माझ्या पाहण्यात अशी कित्येक घरं आहेत जिथं केवळ मुलाला अमुक भाजी आवडत नाही म्हणून दुसरी केली जाते. सकाळी झोपेतून उठवून टूथब्रशवर पेस्ट लावून हातात देणाऱ्या सुद्धा आया आहेत. या घरातल्या बबड्यांना साधं शर्टाचं तुटलेलं बटणसुद्धा सुईदोरा घेऊन शिवता येत नाही, इस्त्री करता येत नाही, भाज्या निवडतां येत नाहीत, दळणाचा डबा घेऊन पिठाच्या गिरणीत जाणं त्यांना कमीपणाचं वाटतं, घरातला संडास धुणं कमीपणाचं वाटतं. मंडईतून घेवडा आण असं म्हटलं की बबडू फरसबी घेऊन येतो. फळं आणायला...

आनंदाची बेरीज

*" ब्रम्हानंद "* म्हणजे काय। ▪बाप  होण्यापेक्षाही...  आजोबा/आजी  होण्याचा   *आनंद!* ▪नातवंडाच्या  कृपेने  अंगावरील  कपडे  ओले  झाल्याचा   *वत्सल  आनंद* ! आणि ▪त्यांनी  केलेले  हट्ट  पुरविण्याचा   *गोड  आनंद!* ▪सूनेने, न  मागता  आणून  दिलेल्या  चहाचा  व  औषध  घेतले  का..?  या  प्रेमळ  चौकशीचा   *सात्त्विक आनंद!* ▪वाढदिवसाला,  मुलाने  दिलेल्या  शालीचा....  *ऊबदार  आनंद*  ▪आपण  कुटुंबाला  हवे  आहोत...... या  भावनेचा    *सुप्त  आनंद*  ▪दुपारी  जेवणानंतर  पेपर  वाचता वाचता   लागलेली  डुलकी ...  *परमानंद. !* ▪रात्रीची निरव शांतता.. आराम खुर्चीवर डोळे मिटून पहुडलेल्या क्षणी.. आपली आवडती गझल.. रेडिओने गुणगुणावी... *स्वर्गीय आनंद!* ▪एखादा लेख किंवा कविता  आपण पोस्ट करावी.. मित्रांनी त्याला भरभरुन  दाद द्यावी... *साहित्या...

शिकण्यासारखे

१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी *धेनु ऋण मंत्र* म्हणत असे.   धेनु (गाय) मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची. २. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर *घेवडा वेल* लावावा सांगत असे.  असे का ह्याचे उत्तरही तयार,  म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते, *दत्तगुरु जेवण्यास येतात*, घरची  घेवडा  भाजी  *गुरुवारी* करावी.  घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.'  ३. अन्नाचे एक शीत तरी *सैनिकासाठी* पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग *तुळशीत अर्पण करावे*.  देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते.  ४. *वाळवण* घालताना आज्जी *सूर्यमंत्र* म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.  ५. रोज एकदा घरच्या झाडांना *कुरवाळून* यायची,  *कोरफडीचे* पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे,  तर म्हणायची, 'स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत.  एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.' ६. *मुंग्यांना साखर* ठेवायची,  म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो,  सुखात राहा, माझ्या लेकरांना डसू न...

मी उद्योजक होणार

*मी उद्योजक होणार*  ----------------------------------------- *1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना*  महाराष्ट्र शासन. उद्योग संचालनालय, जिल्ह्य उद्योग केंद्र. 💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐     💐💐🌹🌹💐💐 योजनेचे नाव ::::-- *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}*     💐💐🌹🌹💐💐 *योजने विषयी थोडेसे* योजनेचे संकेतस्थळ :-  *http://maha-cmegp.gov.in*   योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र   योजनेचे निकष :- 1) वयोमर्यादा 18 ते 45      (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष ) 2) शैक्षणिक पात्रता  (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास  (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास  3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख  4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख  प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे  (i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%  (iI)...

आजारी पडण्यापुर्वी आयुर्वेद

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो* 1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या. 3) मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4) किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या. 5) पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6) सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या. 7) टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा. 8) दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका. 9) डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा. 10) भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या. काही आजार नसला तरी  अनुलोमीलम 15 मी  कपालभाती 15 मी  सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा  आरोग्य संवाद स्वतः साठी एवढं तरी करा १) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस क...

कामाची लाज वाटणं

कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर.     दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली.  उदाहरणादाखल मी काही गोष्टी प...

परीक्षा

🌻🌻🌻 *परीक्षा* (दहाएक वर्षांपूर्वी सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक शेखर कपूर यांनी लिहिलेला एक ब्लॉग शेखर कपूर यांनी एक भारीतला ब्लॅकबेरी फोन अमेरिकेतून खरेदी केला होता. आणि काही दिवसातच त्या ब्लॅकबेरी फोनचा काही तरी टेक्निकल लोच्या झाला. आता आली पंचाईत, त्या काळात ब्लॅकबेरीची सर्व्हिस सेंटर नव्हती. अनेक मोठया दुकानात शेखर कपूरने आपला फोन दाखवला पण सगळयांनी हात वर केले. हा फोन आता अमेरिकेला कुरियरने पाठवावा लागेल आणि दुरुस्ती करता कदाचित तीसेक हजार खर्च येईल, असा सल्ला काही हायफाय एसी मोबाईल सर्विस सेंटरने दिला. डायरेक्टरसाहेब तर हादरुनच गेले. ब्लॅकबेरी घेण्याचा गाढवपणा केलाच आहे तर आणखी एक गाढवपणा करुयात म्हणून एकेदिवशी त्यांनी आपली कार जुहू मार्केटच्या रस्त्यावरल्या एका टपरीवजा दुकानासमोर थांबवली. *दुकानावर अस्खलित इंग्रजीत “Cellphoon reapars” अशी पाटी लिहिली होती.* तरीही धाडसाने शेखर कपूर दुकानाकडे आले. त्या कळकट दुकानात हाडकुळासा ११-१२ वर्षाचा पोर मळकट, फाटकी जीन्स आणि टीशर्ट घालून उभा होता. “ ब्लॅकबेरी ठीक कर पावोगे?,” कपूर साहेबांनी त्या पोराला अविश्वासाने विचारले.  “ बिलकुल.. क्य...

छत्रपती शिवराय

*छत्रपती* एक आख्यायिका का झाले...  शिवाजी महाराजांचे 7 घोडे - 1- मोती 2- विश्वास  3- तुरंगी  4- इंद्रायणी 5- गाजर  6- रणभीर 7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले. शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत. छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता.  संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी.  मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले.  जगातील 111 देशात १९फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला. छत्रपती शिवाजी महाराज एक  भूगर्भ शाश्रज्ञ-   आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही...

अध्यात्म म्हणजे काय?

*अध्यात्म म्हणजे काय* ? *अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.* *अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.* *अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.*  *अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.* *अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.*  *अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.* *अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.* *अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.* *अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.* *अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.* *अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.* *अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.* *अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.* *अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.*  *अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.* *अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.*  *अध्यात्म म्हणजे आपल्या ब...

निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ?

1. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ? एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे प्रकार आहेत. नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पुर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पुर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत. अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती होय. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटूंबियांना मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटूंबियांना त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जाते.   2. निवृत्ती वेतन कोणाला देय आहे ? सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी 10 वर्ष कालावधी हिशेबात घेतला जातो. आता 10 वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर पुर्ण निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची...